सारा न्यूज नेटवर्क -
राम हुंडारे यांना 2025 चा "आदर्श पत्रकार दर्पणरत्न" पुरस्कार मिळाल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार संपन्न..
अनेक मान्यवरांची उपस्थिती..
सोलापूर (प्रतिनिधी ):- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेल्या पाच वर्षापासून "सारा न्यूज नेटवर्क" च्या माध्यमातून समाजातील रंजलेल्या गांजलेल्या वंचित शोषित पीडित त्याच बरोबर अन्यायग्रस्त लोकांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीचा परखड आवाज प्रशासन दरबारात काढून वंचित पीडित घटकाच्या मूलभूत न्याय हक्कासाठी तसेच पत्रकारिता केवळ व्यवसाय नसून ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून खरी खुरी पत्रकारिता जपणारे पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना उल्हासनगर येथील संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने 2025 चा "आदर्श पत्रकार दर्पणरत्न" पुरस्कार घोषित करण्यात आला असून शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारीला रोजी उल्हासनगर जिल्हा ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आदरपूर्वक सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
त्या निमित्ताने पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने राम हुंडारे यांचा जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा संघटक सादिक शेख, शहरअध्यक्ष आन्सर तांबोळी (बीएस), शहरअध्यक्ष महिला विभाग रक्षंदा स्वामी, शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, मोहसीन बागवान, साप्ताहिक कार्यसम्राटचे पत्रकार वैभव राऊत, पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य महेश मेटकरी, इमरान अत्तार, मुजमिल काखंडकीकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment