Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 18, 2025

सोलापुर हैदराबाद रोडवर बलकरच्या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्या; मानव अधिकार संरक्षण संघटनेची मागणी..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापुर हैदराबाद रोडवर बलकरच्या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्या;

मानव अधिकार संरक्षण संघटनेची मागणी.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरात हैदराबाद रोडवर कृषी संशोधन केंद्राच्या शेजारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बलकर चा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात झाला या घटनेत विवेक लिंगराज, आसिफ चांद पाशा बागवान, तोहीद माजिद कुरेशी  या तिघांचा मृत्यू झाला.

 या घटनेत निधन झालेल्या तिघांच्या कुटुंबियास शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्या म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे.


 व तसेच सोलापूर शहरात  मार्केट यार्ड हैदराबाद रोड, विजापूर रोड, तुळजापूर नाका, अक्कलकोट रोड, होडगी रोड, मंगळवेढा रोड, पुणे रोड येथून शहरात बाहेरून येणारे जड वाहतूक  याच्यावर तात्काळ प्रतिबंध लावून  एक मर्यादित वेळ ठेवून या सर्व स्पॉटवर सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून सिग्नल व तसेच रेड व ग्रीन सिम्बॉल लावून या सर्व जड वाहनांना शहरात एक वेळेवर येण्यासाठी उपाययोजना करा,

 कारण शहरातील अनेक ठिकाणी होऊन जडवाहन दिवसभर कुठल्याही वेळेवर शहरात गजबजलेल्या परिसरात प्रवास करीत आहे त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी अनेकदा अपघात देखील झाले आहे शहरातील या अपघातामध्ये अनेक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या देखील मृत्यू झाला आहे  बाहेरून येणारे जड वाहन याच्यावर कुठलीही प्रतिबंध नसल्यामुळे व वेळ मर्यादा अबाधित नसल्यामुळे अनेक जण सामान्य नागरिकांचा जीव   मुठीत ठेवून प्रवास करण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे त्यासाठी तात्काळ याच्यावर प्रतिबंध लावून एक मर्यादित वेळ ठेवून जड वाहनास शहरात एन्ट्री द्या अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

 त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, प्रदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी, शहराध्यक्ष अझहर बिजापुरे, शहर कार्य अध्यक्ष फयाज मुल्ला, शहर संपर्कप्रमुख मीर महमद खान,अफजल शेख उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment