Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, February 19, 2025

क्राईम न्यूज : पुण्यामध्ये रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटले..


 सारा न्यूज नेटवर्क - 

क्राईम न्यूज : पुण्यामध्ये रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटले.. 

पुणे (प्रतिनिधी ) : - राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी रिक्षाचालकाला मारहाण करून लुटल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडली आहे. मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. युवराज अंबालप्पा भिल्लव (वय २५, रा. धायरी) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. भिल्लव यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षाचालक भिल्लव शुक्रवारी सायंकाळी नवले पुलाजवळ प्रवाशांची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून तिघे जण तेथे आले. दुचाकीवरील तिघांनी भिल्लव याच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढला. रिक्षाचालक भिल्लवने दुचाकीवरुन पसार झालेल्या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर दुचाकीवरील चोरट्यांना थांबविले. चोरट्यानी भिल्लव याच्या उजव्या हातावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. चोरट्यांनी त्याच्या खिशातील पाचशे रुपये काढून घेतले, तसेच रिक्षाची काचही फोडली. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

( प्रतिनिधी - दत्ता कदम ) 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment