सारा न्यूज नेटवर्क -
"सारा न्यूज नेटवर्क" सोलापूर शहर प्रतिनिधी पदी राहुल जाधव यांची नियुक्ती..
सोलापूर शहरातील कामगार व व्यावसायिकांची अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा - अँड दिलीप जगताप
सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली दोन वर्षांपासून सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सारा न्यूज नेटवर्कने सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रात आपला आगळा वेगळा वाचक त्याचबरोबर वेगळा ठसा उमटवला आहे.
सारा न्यूज नेटवर्कच्या सोलापूर शहर प्रतिनिधी पदी राहुल सुभाष जाधव यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नावाची घोषणा सारा न्यूजचे संपर्कप्रमुख देवप्पा शिंदे यांनी आज केली आहे.
अँड दिलीप जगताप, जेष्ठ पत्रकार अन्सार तांबोळी, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ नियुक्तीपत्र ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख , जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, मोहोळ तालुका कर्याअध्यक्ष सागर पवार, मोहोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख अजय तोडकर,ॲड. दिलीप जगताप, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, अरुण सिडगिद्दी, राजू वग्गु, आनंद गुंड , राजू पवार, गणेश कारंडे, योगीनाथ स्वामी, रक्षंदा स्वामी , अतुल भडंगे , वासिमराजा बागवान, तानाजी माने, प्रवीण राठोड सह पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल जाधव यांचे पुणे जिल्हा प्रतिनिधी देवप्पा शिंदे व दत्ताभाऊ कदम, शहर प्रतिनिधी प्रशांत भोसले, विनायक रणदिवे, मावळ प्रतिनिधी ज्ञानदेव कदम, रमेश शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment