सारा न्यूज नेटवर्क -
सारा न्यूजच्या संपर्क प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते देवप्पा शिंदे यांची निवड..
शिंदे यांच्या निवडीने सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन...
सोलापूर (प्रतिनिधी ):- सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन आपल्या बातमीच्या माध्यमातून आगळावेगळा वाचक वर्ग निर्माण करणाऱ्या त्याचबरोबर समाजातील तळागाळातील वंचित घटकाला प्रशासन दरबारात न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणाऱ्या सारा न्यूज नेटवर्कच्या संपर्कप्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे जिल्हा प्रतिनिधी देवप्पा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा सारा न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक राम हुंडारे यांनी निवड करण्यात आल्याची घोषणा केली.
देवप्पा शिंदे हे संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशनचे प्रदेशअध्यक्ष आहेत. त्यांनी सामाजिक, अध्यात्मिक, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शैक्षणिक, महिला व बालकल्याण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून समाजातील वंचित पिढीत घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात.
त्यांच्या निवडीने समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, सहसंपादक मनोज देवकर, पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ कदम, मावळ तालुका प्रतिनिधी ज्ञानदेव कदम, रमेश शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment