Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 25, 2025

संत निरंकारी मंडळाकडून धर्मवीर संभाजी महाराज तलावाची स्वच्छता..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संत निरंकारी मंडळाकडून धर्मवीर संभाजी महाराज तलावाची स्वच्छता.. 

अभियानामध्ये सारा न्यूज नेटवर्क, mh13e सोशल मीडिया, सोलापूर सोशल फाउंडेशन, इको नेचर क्लब व पर्यावरण संस्था यांचा सहभाग.. 

सोलापूर (प्रतिनिधी) : - येथील संत निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि परिसराची स्वच्छता केली. तलावात पडलेले देवी-'देवतांचे फोटो, निर्माल्य काढले. या भागातील झाडी-झुडपे हटवली.



महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ही विशेष स्वच्छता राबविल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.


धर्मवीर संभाजी महाराज तलावाजवळ स्वच्छता करताना अतिरिक्त आयुक्त रवी पवार 

 या मोहिमेत १०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत महानगरपालिकेचे घंटागाडी व त्यांचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. 



संत निरंकारी मंडळ व सोलापूर महानगरपालिका आयोजित जलस्वच्छता छत्रपती संभाजी तलाव परिसर स्वच्छता या अभियानामध्ये सारा न्यूज नेटवर्क, mh13e सोशल मीडिया, सोलापूर सोशल फाउंडेशन, इको नेचर क्लब व पर्यावरण संस्था, स्वच्छता दूत यांचा सहभाग होता. 


अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर तसेच पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यानेही स्वच्छता विषयी व पर्यावरण वृक्ष लागवड विषयी प्रबोधनात्मक आपले मनोगत व्यक्त केले. व येत्या काळात स्वच्छतेबरोबर लोकसंख्येच्या पाचपटी वृक्ष लागवड करण्याचे आयोजनची सुरुवात झाली आहे. 

 या परिसरातील सर्व कचरा काढणे, माती गोळा करणे, झाडेझुडपी छाटणे आदी कामे करण्यात आली. त्याचबरोबर तलावाकाठी आलेला कचराही काढण्यात आला. 

या स्वच्छता मोहिमेमुळे हा परिसर चकाचक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुमारे दहा टन कचरा काढल्याचे मंडळाचे सदस्य म्हणाले. ही मोहीम झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पवार यांनी मंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment