Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, February 12, 2025

संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान च्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब सुरवसे यांची निवड...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान च्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब सुरवसे यांची निवड...

सोलापूर (प्रतिनिधी) :- समाजाच्या प्रती असलेली तळमळ, लोकसेवेचा ध्यास, तथा सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मोलांचे कामगिरी पाहता "संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान" ठाणे या नोंदणीकृत संस्थेत सोलापूरचे बाळासाहेब सुरवसे यांची सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 


या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे यांच्या हस्ते देण्यात आले.  बाळासाहेब सुरवसे यांचे सोलापूरातील अशोक चौक येथे विकी फुटवेअर नावाचे शॉप असून ते हा व्यवसाय सांभाळून समाजकार्य देखील करतात. त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ,  लोकसेवेचा ध्यास तथा सामाजिक धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मोलाची कामगिरी पाहता प्रतिष्ठानने ही निवड केली आहे.

त्यांच्या निवडीने समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment