सारा न्यूज नेटवर्क -
नळदुर्गचे नवनियुक्त पोलिस अधिकारी सचिन चंद्रकांत यादव यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार...
नळदुर्ग ( विशेष प्रतिनिधी प्रविण राठोड ) :- धडाडीचे पोलीस अधिकारी अशी ख्याती असणारे नळदुर्ग चे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सचिन चंद्रकांत यादव यांचा सत्कार करण्यात आला.
कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, आणि सामाजिक दृष्टिकोन ठेऊन वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणारे नळदुर्ग पोलीस स्टेशन चे सिंघम प्रभारी अधिकारी म्हणून ओळख असणारे सचिन चंद्रकांत यादव यांचे यथोचित सत्कार करण्यात आले.
यावेळी पत्रकार सुरक्षा समिती चे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार सुरक्षा समिती चे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रवीण राठोड यांच्या वतीने साहेबांचे यथोचित सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी तानाजी चव्हाण , बंकठ राठोड, प्रवीण राठोड इतर कार्यकर्ते व पोलीस स्टेशन चे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नळदुर्ग शहरात शांतता व सुरक्षिततेचे स्थैर्य देण्यासाठी आपण यशस्वी व्हाल अशा मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या .
- विशेष प्रतिनिधी प्रविण राठोड तुळजापूर धाराशिव
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment