सारा न्यूज नेटवर्क -
"सारा न्यूज नेटवर्क" पुणे शहर प्रतिनिधी पदी सामाजिक कार्यकर्ते विनायक कृष्णा रणदिवे यांची नियुक्ती..
पुणे शहरातील कामगार व व्यावसायिकांची अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा - दत्ताभाऊ कदम, जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली दोन वर्षांपासून सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सारा न्यूज नेटवर्कने सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रात आपला आगळा वेगळा वाचक त्याचबरोबर वेगळा ठसा उमटवला आहे.
सारा न्यूज नेटवर्कच्या पुणे शहर प्रतिनिधी पदी विनायक कृष्णा रणदिवे यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नावाची घोषणा सारा न्यूजचे संपर्कप्रमुख देवप्पा शिंदे यांनी आज केली आहे.
पुणे शहरातील कामगार व व्यावसायिकांची अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ कदम यांनी यावेळी नवनियुक्त शहर प्रतिनिधी विनायक रणदिवे यांना अभिनंदन करतेवेळी दिला.
विनायक रणदिवे यांचे मुख्य संपादक राम हुंडारे व सहसंपादक मनोज देवकर व पुणे जिल्हा प्रतिनिधी देवप्पा शिंदे व दत्ताभाऊ कदम, शहर प्रतिनिधी प्रशांत भोसले, मावळ प्रतिनिधी ज्ञानदेव कदम, रमेश शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment