सारा न्यूज नेटवर्क -
जत तालुक्यातील चार वर्षीय मुलीवरती अमानवी कृत्य करून खुन केले प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा करावी;
"संत रविदास चर्मकार युवा महासंघ" ता. जत जिल्हा सांगली यांची मागणी...
जत (प्रतिनिधी) :- जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षीय मुलीवरती नराधमाने अमानवी व अमानुषपणे बलात्कार करून तिचा निघृण हत्या केलेली आहे. सदरची घटना ही मानवी मुल्यास काळीमा फासणारी आहे. सदरची घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून सदर घटनेचा तपास हा अतिशय काटेकोर व योग्य रित्या होणे गरजेचे आहे.
सदरची घटना जी घडली आहे त्यास अतिशय दंडनिहाय शिक्षा ही आपल्या भारतीय कायदयात नमूद आहे. त्यामुळे सदर घटनेचा तपास अतिशय योग्य रित्या होवुन सदरकामी आपल्या मार्फत मा. जिल्हा सरकारी वकील सांगली किंवा विशेष सरकारी वकील यांच्यामार्फत सदरचा घटना चालविणे गरजेचे आहे. त्यामुळे खटलेकामी जिल्हा सरकारी वकिल किंवा विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करून सदर खटला जलद गतीने फास्ट ट्रक पध्दतीने न्यायालयात चालवुन लवकरात लवकर पिडीताला व पिडीताच्या कुटुंबियांना न्याय देणेत यावा ही विनंती. या आशयाचे पत्र मा.उपविभागीय अधिकारी जत यांना देण्यात आले. यावेळी निशांत बुरुटे, साहेब राव बुरुटे, लखन कोळी, धनंजय मोडीकर, प्रमोद होनकांबळे,लखन देशमुख यांच्या वतीने निवेदन देण्यात आले
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment