Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 27, 2025

छन्नुसिंह चंदेले महाविद्यालय च्या वतीने पत्रकारिता विद्यार्थी यांचा प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया अभ्यास दौरा संपन्न...


 सारा न्यूज नेटवर्क - 

छन्नुसिंह चंदेले महाविद्यालय च्या वतीने पत्रकारिता विद्यार्थी यांचा प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया अभ्यास दौरा संपन्न... 


दै.संचार, 95 MY FM आणि लोकप्रधान न्यूज चॅनेल ला दिली भेट..

सोलापूर (प्रतिनिधि) :- सोलापूर येथील भाई छन्नूसिंह चंदेले पत्रकारिता महाविद्यालय या वतीने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 

विशाखा महिला लोकसेवा साधन केंद्र  सोलापूर संचलित 

भाई छन्नुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय.

DMCJ डिप्लोमा मास इन कम्युनिकेशन 

(वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन  पदविका कोर्स) 

संस्थापिका अध्यक्ष माजी महापौर नलिनी चंदेल .

प्रा. मनिषा पाटील मॅडम, 

प्राचार्य. सिध्दार्थ गायकवाड, 

प्राध्यापक. विजयकुमार लोंढे, 

प्राध्यापक. विशाल पाटील. 

यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक अंतर्गत येणाऱ्या या महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापण पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी  सोलापूर शहरातील विवीध माध्यम संस्थाना भेटी देवून तेथील कार्याची सखोल माहीती घेतली. 

या महाविद्यालयाचे प्रा.विशाल पाटील आणि प्रा.विजयकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या अभ्यास दौऱ्यात वृत्तपत्रविद्या  व जनसंज्ञापण पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत येणाऱ्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापण पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदविला. 

या उपक्रमाअंतर्गत सोलापूर शहरातील तीन ठिकाणी भेटी देऊन माहिती घेण्यात आली. हि तिन्ही ठिकाणे मिडियाशी संबधित असून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये या ज्ञानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.



सोलापूर शहरातील भास्कर समुहाच्या 95 my FM या FM केंद्राला प्रथम भेट देण्यात आली. या FM केंद्रा अंतर्गत राबवणाऱ्या विवीध उपक्र‌माची माहीती सौरभ म्हामाने यांनी दिली. या ठिकाणी कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग व प्रसारण या बाबत विद्यार्थ्यांनी सखोल अशी माहीती घेतली.                                   

यानंतर सोलापूर शहरात प्रसिद्ध वृत्तमानपत्र दैनिक संचार या कार्यालयात भेट देण्यात आली.




यावेळी बातमी लिखाणाची पद्धत बातमीचे संपादन, मुद्रीत शोधन आणि छपाई इत्यादि विषयी विस्ताराने माहीती घेन्यात आली. प्रत्यक्ष छपाई मशीन आणि तेथील कामकाज या विषयी विद्यार्थ्यांनी माहीती घेतली. प्रिंट मिडीया म्हणून दैनिक संचार या वृत्तपत्राची योगदान आजची पत्रकारिता, पत्रकारांचे कार्य आणि इतर विषयवार उपसंपादक प्रशांत जोशी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.


त्यानंतर सोलापूर शहरातील डीजीटल  आणि प्रिंट मिडिया म्हणून नावापदास आलेल्या लोकप्रधान या कार्यालयास ही भेट देण्यात आली. लोकप्रधानचे मुख्य संपादक अयाज शेख आणि संपादक असलम शेख यांनी सर्व विद्यार्थ्यांचा लोकप्रधानच्या वतीने सत्कार केला.



यावेळी मुख्यसंपादक अयाज शेख व संपादक असलम शेख यांनी पत्रकरीता करत असताना निर्भीड पणे सत्याची बाजू मांडली तर कोणासही घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. यावेळी पत्रकरिता ही विकासासाठी कशी पोषक असते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लोकप्रधानच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली.

या संपूर्ण अभ्यास दौऱ्यात प्राध्यापक विजयकुमार लोंढे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment