Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 25, 2025

संत रविदास चर्मकार युवा महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल गणपती जगन्नाथ शिंदे यांचा सत्कार संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संत रविदास चर्मकार युवा महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल गणपती जगन्नाथ शिंदे यांचा सत्कार संपन्न.. 


अविस्कार नांगरे व हंनमतराव आवळेकर सोसायटी संचालक पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.. 

सांगली (प्रतिनिधी) :- संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाैंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.दत्ताभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दि २२/२/२०२५ वार शनिवार रोजी.मा.श्री.गणपती जगन्नाथ शिंदे यांची संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल तसेच अविस्कार नांगरे व हंनमतराव आवळेकर सोसाटी संचालक पदी निवड झाल्या बद्दल बहे सेवा सहकारी सोसायटी मर्यादित बहे चेअरमन,व्हाईस चेअरमन व सर्व सचालक ता वाळवा जिल्हा सांगली यांच्या कढुन सत्कार करण्यात आला. 


या सत्काराला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच मा.श्री.गणपती जगन्नाथ शिंदे यांनी सोसाटी मध्ये अधिक चांगल्या प्रकारे सर्व सभासदांना चांगली सेवा देण्याची खात्री व्यक्त केली व मी सध्या संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाैंडेशन महाराष्ट्र राज्य याही संघटनेचे पदाअधिकारी म्हणून काम करत असुन त्याही ठिकाणी माझ्या कढुन समाजातील लोंकाची कामे व त्या समाज घटकास न्याय मिळवून देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत राहीन.असी मी आपल्या सर्वाना खात्री देतो असे श्री गणपती शिंदे यांनी सत्कार समारंभ वेळी सांगितले. तसेच त्यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment