Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 1, 2025

सारा न्यूजचे पत्रकार व कामगार नेते ज्ञानदेव कदम यांना "आदर्श कामगार नेता पुरस्कार 2025 " राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ज्ञानदेव कदम : कामगार हक्कांचा निडर पहारेकरी

सारा न्यूजचे पत्रकार व कामगार नेते ज्ञानदेव कदम यांना "आदर्श कामगार नेता पुरस्कार 2025 " राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान..

उल्हासनगर (प्रतिनिधी) :- कामगार हा समाजाच्या अर्थचक्राचा मुख्य आधारस्तंभ आहे, पण दुर्दैवाने, तोच सर्वात जास्त उपेक्षित आणि शोषित राहतो. त्याच्या श्रमाला योग्य तो न्याय मिळावा, त्याच्या हक्कांची पायमल्ली होऊ नये, आणि त्याच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी अविरत संघर्ष करणारे मोजकेच लोक असतात. मा. श्री. ज्ञानदेव काशिनाथ कदम हे असेच एक ध्येयवेडे नेतृत्व, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगार चळवळीला समर्पित केले आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान, उल्हासनगर यांच्या वतीने त्यांना “आदर्श कामगार नेता पुरस्कार – 2025” ने सन्मानित करण्यात आले.


हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही, तर कामगारांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या एका लढ्याचा सन्मान आहे. हा पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेश अध्यक्ष व मा. कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी साहेब आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. गजानंद जी लिंबोरे यांनी त्यांचे कार्य गौरवले.




संघर्षाला गवसणी घालणारा नेता

ज्ञानदेव कदम हे ज्ञानदेव कदम हे केवळ एका संघटनेपुरते मर्यादित राहिले नाहीत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य व १४ ते १५ वर्ष युनिट अध्यक्ष एल अँड टी एल डी ए लोणावळा, २०२२ मध्ये पुन्हा कामगारांनी त्यांच्या कामाची पोच पावती देत, एल अँड टी लोणावळा कामगार निवडणुकीमध्ये युनिट प्रतिनिधी म्हणून पुन्हा भरघोस मतांनी विजय, आणि संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे महासचिव म्हणून त्यांनी हजारो कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे. 

त्यांची कामगार चळवळ ही केवळ घोषणा किंवा निवेदनापुरती नव्हती, ती प्रत्यक्ष कृतीतून उभी राहिली.

• कामगारांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली.

• विविध कंपन्यांमध्ये अन्यायकारक पद्धतीने काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न केले.

• कामगारांना त्यांच्या हक्कांचे ज्ञान मिळावे म्हणून विविध उपक्रम राबवले.

कामगारांच्या व्यथा त्यांच्या वेदना होत्या, आणि त्यांचे स्वप्न हेच त्यांचे ध्येय.



मैत्रीचा बादशहा, संघर्षाचा शिलेदार

ज्ञानदेव कदम हे केवळ संघर्षशील कामगार नेता नाहीत, तर ते माणसांना जोडणारे नेतृत्व आहे.

• त्यांच्या संघर्षाची धार जशी तीव्र आहे, तशीच त्यांची मैत्रीही खोल आहे.

• कोणतीही समस्या आली की ती सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

• मैत्रीचा धागा मजबूत ठेवत त्यांनी असंख्य लोकांची मने जिंकली आहेत.



त्यांच्यासाठी नेतृत्व म्हणजे पद नव्हे, ती जबाबदारी आहे.

सन्मान म्हणजे नवी जबाबदारी :

हा पुरस्कार हा पुरस्कार म्हणजे केवळ एक गौरवपत्र नाही, तर ही कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा आहे.

ज्ञानदेव कदम यांचे हे कार्य आजच्या आणि उद्याच्या पिढीला दिशा दाखवणारे ठरेल. हा पुरस्कार म्हणजे संघर्षाचा विजय, सत्याचा सन्मान आणि कामगार हक्कांचे दिपस्तंभ!

आता सध्या पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य मावळ तालुका संपर्कप्रमुख, सारा नेटवर्क न्यूज मावळ तालुका प्रतिनिधी, विश्वस्त संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ, उपाध्यक्ष संत रोहिदास समाजसेवा संघ मावळ, सरचिटणीस संत रविदास सेवा संघ कामशेत या सामाजिक संघटनेच्या पदावरती कार्यरत असून त्यांचे समाजकार्याची वाटचाल चालू आहे......

शुभेच्छुक :

मा. श्री. देवप्पा शिंदे (पत्रकार) 

• प्रदेश अध्यक्ष - संत रविदास चर्मकार युवा महासंघ

• प्रदेश उपाध्यक्ष - संत शिरोमणी गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था

• जनसंपर्क प्रमुख - सारा न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र राज्य

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment