सारा न्यूज नेटवर्क -
पु ना गाडगीळ ज्वेलर्स व्हीआयपी रोड सोलापूर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- देशभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी महिलादिन साजरा केला जातो संघर्षवादी महिलांचा सन्मान केला जातो महिला या कुटुंबाची मोठी व महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष निर्भिडपणे काम करत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात सामाजिक राजकीय शैक्षणिक तथा विविध क्षेत्रात काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी जेणेकरून त्यांना काम करण्यासाठी नव्याने आणखी ऊर्जा मिळेल यासाठी पु ना गाडगीळ ज्वेलर्स यांच्या वतीने "नारी शक्तीचा" सन्मान व्हीआयपी रोड सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर मध्ये नुकत्याच प्रसिद्ध सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते ओपन झालेल्या पु ना गाडगीळ ज्वेलर्स व्हीआयपी रोड सोलापूर मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सोलापुरातील खूप साऱ्या महिलांनी त्यात सहभागी घेतला आणि चांगला प्रतिसाद दिला आहे.
या कार्यक्रमामध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज केले गेले होते जसे की फॅशन शो, फोटोशूट, क्विज कॉंपीटीशन, ग्रुप गेम्स असे अनेक प्रकारचे ऍक्टिव्हिटी घेण्यात आले होते.
यामधील विजेत्या महिलांना पुरस्कार स्वरूप पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापक राहूल बाकळे यांनी सर्व उपस्थित महिलांना पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स तर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment