सारा न्यूज नेटवर्क -
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन च्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीसांना भेटवस्तू देऊन “जागतिक महिला दिन” साजरा...
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी ) :- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन च्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीसांना भेटवस्तू देऊन “ जागतिक महिला दिन ” साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा स्वरूपाताई खापेकर, मावळ लोकसभा महिला संपर्क प्रमुख सायली साळवी, पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख विनायक जगताप, संदिप भालके, उदय वाडेकर,रविकांत सागवेकर, जयेश महाजन,अनिकेत वारके आदी उपस्थित होते.
महिलांना सुरक्षित व सशक्त बनवण्यासाठी महिला पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. महिला सक्षमीकरण हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महिला पोलिसांमुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या पातळीत वाढ होते आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेतही मदत होते. पोलिस महिला भगिनींमूळे या शहरातील सामाजिक सुरक्षा अबाधित राहिली आहे. त्यामुळे या महिलादिनी त्यांचा सन्मान करत आहोत, महिला पोलिसांचे कार्य कौतुकास्पद असल्यामुळे पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. श्री गजानन चिंचवडे यांनी सत्कार समारंभाचे वेळी सांगितले.
ज्ञानदेव काशिनाथ कदम -
मावळ तालुका संपर्कप्रमुख
पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment