Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, March 25, 2025

करवीर तालुक्यातील हसूर येथील पोलीस पाटील यांच्या मुलाने गळपास घेऊन आत्महत्या केली.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

करवीर तालुक्यातील हसूर येथील पोलीस पाटील यांच्या मुलाने गळपास घेऊन आत्महत्या केली.

करवीर (प्रतिनिधी) :- याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार 

मृत व्यक्तीचे नाव तानाजी  साताप्पा परिट वय ४०. 

तो वीजबीले टाकण्याचे काम तसेच कपडे इस्त्री करण्याचा व्यावसाय करत होता. 

विभक्त राहत होता.

तो सोमवारी रात्री घरातून निघून गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यानं घरच्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा काही शोध लागला नाही. 

मात्र  आज सकाळी  हसूर - राशिवडे  मार्गावरील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. असल्याचे तेथील शेतकऱ्यांना दिसले .

याबाबत त्यांनी पोलीस पाटील साताप्पा परिट यांना  या घटनेची माहिती दिली. त्याला  सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले एक भाऊ वडील  असा परिवार आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment