Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 24, 2025

माँ साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्यावतीने विभागीय रेल्वे कार्यालय येथे परमिट वाहन धारकांना टॅक्सी पॉईंट मिळण्यासाठी निवेदन



सारा न्यूज नेटवर्क - 

 माँ साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्यावतीने विभागीय रेल्वे कार्यालय येथे परमिट वाहन धारकांना टॅक्सी पॉईंट मिळण्यासाठी निवेदन 

सोलापूर दि. 24 (प्रतिनिधी):- माँ साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा टीमच्यावतीने विभागीय रेल्वे कार्यालय येथे सोलापूर रेल्वेस्टेशन बाहेर परमिट वाहन धारकांना टॅक्सी पॉईंट मिळण्यासाठी रेल्वे प्रबंधक योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.


भारतातील सोलापूर रेल्वे स्टेशन हे भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे स्टेशन मानले जाते, इतर राज्यातून आणि महाराष्ट्रातून सोलापूरला मोठ्या प्रमाणात भाविक देवदर्शनासाठी येत असतात. यावेळी प्रवाशांची टॅक्सिकरिता तारांबळ होत आहे. पंढरपूर,तुळजापूर गाणगापूर,अक्कलकोट तसेच सोलापूरातील सिद्धेश्वर देवस्थान इत्यादी देवदर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने सोलापूर रेल्वे स्टेशनला येतात. परंतु सोलापूर रेल्वे स्टेशनवर अद्यापही टॅक्सी पॉईंट नाही. फक्त परमिट वाहन धारकांना टॅक्सी पॉईंट मिळावा म्हणून माँ साहेब कॅब संस्थेच्यावतीने विभागीय रेल्वे कार्यालय येथे निवेदन देण्यात आले .


यावेळी संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यासीन भाई शेख, उपाध्यक्ष श्रीकांत हेळवे, सचिव रणजीत महामुनी, सल्लागार संगप्पा कांबळे,कार्याध्यक्ष प्रदीप कोळी, रोहीत परदेशी,सोमलिंग खराडे,ओंकार म्हमाने, राहुल जाधव,अविनाश राठोड, संदीप घायाळ यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment