Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 5, 2025

अशोक वसईकर यांना" शिक्षणरत्न पुरस्कार 2025 " राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान..


सारा न्यूज नेटवर्क - 

अशोक वसईकर यांना" शिक्षणरत्न पुरस्कार 2025 " राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.. 

उल्हासनगर (प्रतिनिधी) :- संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सव 2025" ठाणे उल्हासनगर संत रविदास महाराज चौक खेमाणी या ठिकाणी मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. 

त्या निमित्ताने " संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार " 2025 समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना प्रदान करण्यात आला. 


अशोक वसईकर यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कडून संत रविदास महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील "शिक्षणरत्न पुरस्कार 2025" प्रदान करण्यात आला. 

अशोक वसईकर अनेक वर्ष सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. शिक्षण ग्रामीण विकास या क्षेत्रामध्ये आपण  केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.आपण केलेल्या या उल्लेखनीय कामांचा गौरव होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अशोक वसईकर यांना " शिक्षणरत्न पुरस्कार 2025 " म्हणून पुरस्कार देण्यात आला. 

अशोक वसईकर यांना मा. कॅबिनेट मंत्री सुर्यकांत गवळी  महाराष्ट्र राज्य, संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोंरे, प्रदेशाध्यक्ष पितांबर शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment