Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 12, 2025

पत्रकार राम हुंडारे यांचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत भाई छन्नुसिंह चंदले कॉलेज यांच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 पत्रकार राम हुंडारे यांचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत भाई छन्नुसिंह चंदले कॉलेज यांच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सारा न्यूज चैनल चे संपादक व पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानकडून "आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार" उल्हासनगर ठाणे येथे नुकताच त्यांना प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचा वाढदिवस व पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत भाई छन्नुसिंह चंदले  कॉलेज यांच्या वतीने डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन यांच्या सर्व प्राध्यापक , विद्यार्थी यांच्या वतीने साजरा करण्यात आला. 





प्रथमता रवी चव्हाण सर यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी बातमी ही चोहोबाजूने मिळते आणि ते दिसती तसे नसते व सत्यात रूपांतर केलं पाहिजे हे पत्रकाराचा आद्य कर्तव्य असे त्यांनी सांगितले. 


तसेच प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांनी राम हुडांरे यांना मिळालेले पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पुरस्कार मिळण्यासाठी काम करायचं नसतं तर आपण काम करत राहिले पाहिजे पुरस्कार हे आपोआप येतात या पत्रकारितेसाठी जो प्रामाणिकपणे काम करतो त्याचं फळ हे नक्कीच पुरस्काराच्या माध्यमातून मिळत असतं .

तसेच शिवलिंग अचलरे सर यांनी राम हुंडाऱे यांच्या च्या अगोदर अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या कामाची प्रेरणा घेऊन आम्हीही काम करू अशी या ठिकाणी ग्वाही देऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 




तसेच यावेळी हर्षदा चव्हाण यांना जागतिक महिला दिनानिमित्त मिस महाराष्ट्र 2025 चा आॅव्हाड मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार शितल राजू डांबरे यांच्या परिवाराच्या वतीने व सर्वांच्या वतीने सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी कॉलेजचे प्राध्यापक विशाल पाटील तसेच गौतम थापटे ,सत्यम गायकवाड, राजेंद्र माने ,सतोष  पवार ,रेखा रोकडे ,व हुंडारे परिवार यावेळी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment