Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, March 20, 2025

मिनी बसला आग, मागील दरवाजा झाला लॉक ; पुण्यातील आगीच्या घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू सहाजण जखमी



सारा न्यूज नेटवर्क - 

मिनी बसला आग, मागील दरवाजा झाला लॉक ;

पुण्यातील आगीच्या घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू सहाजण जखमी 

कंपनी पासून दोन मिनीटांच्या अंतरावर घडली घटना.

हिंजवडी पुणे (प्रतिनिधी) :- हिंजवडीत विगो ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल र क्र MH 14 CW 3548 या कंपनीच्या बसला शॉर्ट सर्किटमुळे सकाळी 7:39 च्या दरम्यानआग लागली या बस मध्ये बारा कामगार कात्रज कोथरूड मार्गे हिंजवडी फेस वन मध्ये येत होते यादरम्यान ड्रायव्हरला पायाखाली चटका भाजल्याने जाणवले व त्याला आग लागलेली लक्षात आले त्या क्षणी त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी थांबली नाही व त्याने गाडीमधून उडी मारली पुढे बसलेले प्रवासी पुढच्या दाराने ताबडतोब उतरले व मागे बसलेले प्रवासी मागील दारे उघडली नसल्याने त्यांचा आगी मध्ये घोरपडून चार कामगारांचा मृत्यू झाला सहा प्रवासी भाजले असून त्यांना रुबी हॉल हॉस्पिटल व इतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आले ही घटना प्रत्येकाच्या हृदयाला हेलावून टाकणारी होती. 

कंपनीपासून दोन मिनिटांच्या अंतरावर घडली घटना ...

कंपनीपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असतानाच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागल्याचे लक्षात येताच बस दुभाजकाच्या बाजूला उभी करून, चालक आणि समोर बसलेले कर्मचारी तातडीने बसमधून बाहेर पडले. परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

मृतांची नावे: सुभाष भोसले (वय ४२, रा. चारजे), शंकर शिंदे (५८, रा. नन्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड) आणि राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी)

पोलीस प्रशासन आरटीओ विभाग पुढील तपास करीत आहे, 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 



No comments:

Post a Comment