Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 23, 2025

श्री धनलक्ष्मी माता मंदिर टिकेकरवाडी येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा. समाजसेविका आरोग्यमित्र ममता कुलकर्णी यांचा स्तुत्य उपक्रम..


 सारा न्यूज नेटवर्क - 

श्री धनलक्ष्मी माता मंदिर टिकेकरवाडी येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा. 

समाजसेविका आरोग्यमित्र ममता कुलकर्णी यांचा स्तुत्य उपक्रम.. 

 सोलापूर (प्रतिनिधी) :- श्री धनलक्ष्मी माता मंदिर टिकेकरवाडी येथे सौ ममता कुलकर्णी यांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे प्रायोजक चंदू काका सराफ बारामती सुवर्णपेढी सोलापूर ब्रँचचे खंडू कुंभार, शिवरुगे उपस्थितीत होते. त्यांच्या कडून विजेत्या स्पर्धकांना चांदीचे नाणे बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते. 


समर्थ फूट वेअर आणि पेंट सोलापूर चे कमल अग्रवाल यांचे लकी ड्रॉ काढणेत आले. 

राजू काळे मंडप कॉन्ट्रॅक्टर सोलापूर,

विशाल पाटील यांचे देखील या कार्यक्रमास सहकार्य लाभले. 

वैभव कलेक्शन तर्फे मुख्य विजेतेस साडी भेट देणेत आले 

 


या प्रोग्रॅम ला श्री सिडेश्वर इंजिनियर पोली टेक्निम चे हेड ऑफ डिपार्ट मेंट चे सौ प्रतिमा ताई पाटील उपस्थित होते,

 प्रेरणा फौंडेशनचे संस्थापिका सौ कविता कोडवन

उपस्थित होते,त्या मॉंटेसरी मान्यता प्राप्त कोर्स चे ट्रेनिग देतात,

पुष्पा राजशेखर ख्यडी या महिला ना मेसचे डबे बनवून देण्याचे काम करतात  कोरोना काळात त्यांनी डबे बनवून देने चे काम व्यवस्थित पणे केले आहे. 

सौ माधवी मॅडम लेडीज आय टी आय येथे कार्यरत असून महिलांना ट्रेनिग देने व सक्षमीकरण करण्याच काम त्या करतात

सौ संपदा जोशी अखिल भारतीय ब्राम्हण समाज अध्यक्ष सोलापुरात वेगवेगळे पदावर काम करत आहेत, 

वैशाली कुलकर्णी श्री स्वामी समर्थ केंद्र गोमय प्रॉडक्ट्स तयार करून देतात,




वरिल सर्व महिलांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात संगीत खुर्ची, एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे म्हणने. लहान मुलींचे नृत्य झाले. त्यामधील विजेत्यास चांदीचे नाणे भेट देणेत आले, 


तसेच चिमणी दिवसाच्या निमित्ताने पक्षी ना पाणी पिणेचे जल पात्र ठेवण्यात आले. व सर्व उपस्थित महिलांन कडून पर्यावरण प्रतिज्ञा घेण्यात आली. यासाठी पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर आणि पर्यावरण प्रेमी सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांचे सहकार्यातून रोपे व जलपात्र ठेवण्यात आले. त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. 

 कार्यक्रम प्रसंगी गायक राजेश कुलकर्णी यांनी बहारदार जुने गीते सादर करण्यात आले. त्यांचा पण सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन सौ ममता कुलकर्णी यांनी केले आहे. यावेळी सौआंबूबाई फुलारी ,सौ सुनीता हद्रल,सौ शीतल सरदेशमुख, विविकानंद केंद्र च्या सर्व महिला हजर होत्या. 

या कार्यक्रमाची माहिती व सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ ममता कुलकर्णी यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment