सारा न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र पोलीस न्यूज २४/live कडून दिनेश जाधव समाजभूषण पुरस्कारने सन्मानित...
कार्ला (प्रतिनिधी ): महाराष्ट्र पोलीस न्यूज २४/ लाईव्ह द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनेश जाधव यांना समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल दि. ०६/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस न्यूज २४. लाईव्ह संपादिका स्मिता बाबरे, व संपादक श्री. रमेश मामा गणगे यांच्या हस्ते समाज भुषण पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दिनेश धोंडिबा जाधव यांना ते करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उरळी कांचन येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
दिनेश जाधव हे श्री गुरु रविदास विश्व महापीठ ट्रस्ट माध्यमातून काम करीत आहेत. तसेच गेली तीस वर्षांपासून ते चर्मकार समाजासाठी अहोरात्र झटत आहेत. कामाची पोचपावती म्हणून त्यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. याबद्दल जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दिनेश जाधव यांनीही पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment