Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, March 11, 2025

महिला दिनानिमित्त हॉटेल श्री गुरुदेवदत्ततर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

महिला दिनानिमित्त हॉटेल श्री गुरुदेवदत्ततर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ;

सुर्यकांत कोकटनूर यांचा सामाजिक उपक्रम.. 

सोलापूर(प्रतिनिधि) : - महिला दिनाच्या निमित्ताने हॉटेल श्री गुरुदेवदत्त तर्फे समाजातील स्त्रीशक्तीला सन्मान देण्याचा एक आगळा उपक्रम राबवण्यात आला. हॉटेलचे मालक सुर्यकांत अण्णाप्पा कोकटनूर यांनी सोलापूर शहर पोलीस पेट्रोल पंपाच्या महिला कर्मचारी वर्गासाठी विशेष थाळी विनामूल्य देऊन त्यांचा सन्मान केला.

या उपक्रमात हजीरादी शेख, नाझिया शेख, प्रिया गायकवाड, स्नेहा चव्हाण, रुपाली गाळे तसेच पंप व्यवस्थापक भाग्येश अहरवाडी, हवालदार गणेश साखरे साहेब आणि कर्मचारी सुभाष बिराजदार यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.


महिलांचे कार्य आणि योगदान अनमोल असून, त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम हॉटेल श्री गुरुदेवदत्ततर्फे राबवण्यात आला. महिलांची मेहनत आणि समर्पण हा समाजाचा कणा आहे, असे मत यावेळी सुर्यकांत कोकटनूर यांनी व्यक्त केले. हॉटेल श्री गुरुदेवदत्त समाजसेवेच्या भावनेने असेच उपक्रम हिरीरीने राबवत राहील, असेही त्यांनी सांगितले. 


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment