Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 9, 2025

मध्य रेल्वेने पहिल्यांदाच ऐतिहासिक पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला.



सारा न्यूज नेटवर्क - 

मध्य रेल्वेने पहिल्यांदाच ऐतिहासिक पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने वंदे भारत एक्सप्रेसमध्ये महिला तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 साजरा केला.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 (8 मार्च) निमित्त सोलापूर - छ.शि.म.ट. मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22226/22225) मध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी पथक तैनात केले. हा उपक्रम महिला सबलीकरणाला चालना देण्यासाठी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये महिलांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो.


या विशेष प्रसंगी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या नेत्रुत्वाखाली कर्तव्य बजावण्यासाठी खालील महिलांची नियुक्ती करण्यात आली होती.

- शिल्पा सी. भालेकर, मुख्य तिकीट निरीक्षक

- प्रिती व्ही. धवणे, मुख्य तिकीट निरीक्षक

- अहिल्या व्ही. राठोड, प्रवासी तिकीट तपासनीस

- लॉर्डेस डी. कॉनलोन, प्रवासी तिकीट निरीक्षक

- लक्ष्मी आर. फुलारी, वरिष्ठ तिकीट परीक्षक



सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण कामकाजाचे वातावरण निर्माण करताना महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी आजवर दिलेल्या समर्पणाप्रती आदर करणे आणि त्यातुंन महिलांचा सम्मान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिला कर्मचाऱ्यांनी रेल्वे सेवेवरील तिकीट-तपासणी कर्तव्ये कुशलतेने व्यवस्थापित केली, ज्यामुळे त्यांची क्षमता आणि प्रवासी सेवा आणि रेल्वे ऑपरेशन्सची बांधिलकी दिसून येते.

मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग महिलांसाठी संधी निर्माण करण्यासाठी आणि रेल्वेच्या सर्व क्षेत्रात त्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

 


No comments:

Post a Comment