Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 2, 2025

संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा " संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार" 2025 वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा " संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार" 2025 वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.. 

उल्हासनगर (प्रतिनिधी) :- संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे जिल्हा उल्हासनगर येथे संत रविदास महाराज चौकात संत रविदास जयंती महोत्सव सोहळा व संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि २८/२/ २०२५ रोजी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. 

  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा कॅबिनेट मंत्री सूर्यकांतजी गवळी  उल्हासनगर उपमहापौर श्री भगवानजी भालेराव भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री महेशजी सुखारामणी मा उद्योजक तथा समाजसेवक श्री संजयजी गुप्ता यांच्या हस्ते संत गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे गुलाबाचे फुल व सन्मानचिन्ह देऊन  प्रदेश अध्यक्ष श्री पितांबर शिंदे व महासचिव श्री अशोक वसईकर सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.व  सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या डॉक्टर वकील शिक्षक समाजसेवक यांना संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 





कार्यक्रमाचे संयोजक कमलेशजी निकम भरत राजवाणी प्रभू लहाने प्रमेराज नेरकर विद्याताई लोंढे उर्फ विकीगुरु संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन भाऊ लिंबोरे यांनी प्रास्ताविक केले,  संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती देताना याचवेळी आपल्या समाजाला जिथे आपल्या समाजाची २०-३०घरे असतील तिथे समाजमंदिर बांधकाम करुन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र आपला समाज पूर्ण ताकदीने त्यासाठी संघटनेच्या पाठिशी उभा राहत नसल्याची खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली आणि आपल्या मागण्यांसाठी एकत्र लढा देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.



       कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री प्रकाश जाधव यांनी भाषणातून  आपल्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आपण करीत असलेल्या कामांची लाज न बाळगताआपल्या मनगटावर विश्वास ठेवून कार्यप्रवण राहून यश संपादन करण्यासाठी आपल्या समाजातील संतमहंतांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले ,तरच अशा कार्यक्रमांचे आयोजनाचा उद्देश सफल होईल. 





यावेळी समाज प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायक मिलींद मोरे यांनी छान गीते सादर केली. 


     प्रफुल्ल केदारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले,या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव व भगीनींनी उपस्थित राहून  कार्यक्रम यशस्वी केला, कार्यक्रमानंतर समस्त समाजबांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला,व सोहळा प्रबोधनात्मक महापुरुषांच्या गायनाने साजरा केला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment