सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास महाराज सभागृह बांधण्यासाठी २ ते ३ गुंठे जागा मागणीचे पत्र सादर..
मुर्तिजापूर/अकोला (प्रतिनिधी) :- श्री संत रविदास महाराज चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्यचे प्रदेश उपाध्यक्षा सौ छाया गजाननराव दहिकर व चर्मकार बंधु यांच्या वतीने संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्रराज्य परिवार च्या माध्यमातून लेटर हेड वरती मजकूर मांडून मागणी मांडण्यात आली.
मा. सौ. छायाताई गजानन दहिकर (महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष ) यांनी त्यांच्या रहात्या गावी मूर्तिजापूर मधील ग्रामपंचायत मध्ये संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या गावात सांजापूर(मो) येथे गावठाण इ/क्लास जमीन मिळावी जिथे सर्व समाज बांधव भगिनी एकत्रित येऊन संत रविदास महाराज यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम नियोजन करण्यास वंचछीत असल्यामुळे जयंती करू शकत नाही. त्या करिता संत रविदास महाराज सभागृहासाठी २ ते३ गुंठे जागा देण्यात यावी अशा आशयाचे पत्र नवंनियुक्त ग्रामसेविका मा. कु. सविता वानखेडे मॅडम तसेच ग्रामसेवक हेंगडसर, सरपंच सुमेध अनभोरे, कर्मचारी गणेश धुमाळे यांच्या कडे देण्यात आले. सर्व कर्मचारी यांनी स्वतः जाऊन या कामासाठी जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन पण करण्यात आले आहे.या कार्या बद्दल मा. छायाताई दहिकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment