Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 14, 2025

तेलंगणात शाहीर रमेश खाड़े यांचा पोवाडा सादर..



सारा न्यूज नेटवर्क - 

 तेलंगणात शाहीर रमेश खाड़े यांचा पोवाडा सादर.. 

         हैद्राबाद (वार्ताहर ) :- सीएसएम-९ टीव्ही चनेलच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, टेलिव्हि-९ चेतना ब्रॉडकास्टिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सीएसएम-९ टीव्ही चॅनेलच्या नेतृत्वाखाली, ९ मार्च २०२५ रोजी बिर्ला प्लॅनेटेरियम, हैदराबाद येथे, महाराष्ट्रातील नामवंत शाहीर रमेश ख़ाड़े यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा बहारदार पोवाडा सादर करून, उपस्थित रसिकांमध्ये चैतन्य जागविले. यावेळी तेथील ज्येष्ठ आमदार बोंगारप्पू दयानंद, सामाजिक कार्यकर्ते साई शिंदे, एकनाथराव डुंगे, आर्ति महिन्द्रकर, निवेदक हर्षवर्धन पाडळे, सीएसएम-९ चनेलचे मालक, संपादक व आयोजक सत्यनारायण जाधव व मुख्य व्यवस्थापक सौं. प्रियांका जाधव यांचेसह अनेक मराठी बांधव उपस्थित होते. 



         या आयोजक संस्थेतर्फे, भारत कला गौरव पुरस्कार-२०२५ व भारत समाज भूषण पुरस्कार-२०२५ वितरण सोहळ्यात, महाराष्ट्रातील विविध लोककलांचे नियोजन केले होते. याच कार्यक्रमात शाहीर रमेश खाड़े यांनी शिवचरित्रावरील पोवाडा सादर करून, तेलंगणात महाराष्ट्रीय शाहीरी कलेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना मनोहर काळे व विशाल काळे यांनी वाद्यांची तर, सिद्धार्थ भडकुंबे, शाम काळे, आबासाहेब साबळे, मिलिंद ताकपेरे, सिद्राम विभुते तसेच, श्रीमती अनिता गवळी, श्रीमती प्रियांका सितासावद, सौं. पद्मावती विभुते, सौं. सुरेखा साबळे, सुप्रिया सीतासावद यांनी सहगायनाची साथसंगत केली. 

          यापूर्वीही शाहीर रमेश खाड़े यांनी, दिल्ली व गुजरात येथेही आपली शाहिरी सादर केली असून, आता तेलंगणात शाहिरी सादर केली असल्याने त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment