सारा न्यूज नेटवर्क -
शिवसेनेच्या संघटनात्मक बळाला नवी दिशा – खेड तालुक्यात नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात ;
खेड तालुका अनुसूचित जाती - जमाती सेल अध्यक्ष पदी संतोष खोपकर यांची वर्णी
रत्नागिरी (प्रतिनिधी) :- वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या त्यागमय कार्याची प्रेरणा घेऊन, शिवसेना हा केवळ एक पक्ष नसून, मराठी माणसाच्या अस्मितेचा व संघर्षाचा आवाज आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली, पक्ष अधिक बळकट होत आहे.
या विचारधारेच्या बळावर, आदरणीय माजी पर्यावरण मंत्री व माजी विरोधी पक्षनेते रामदास भाई कदम आणि महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते, मा. श्री. शशिकांत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मा. श्री. संतोष दत्ताराम खोपकर यांची शिवसेना अनुसूचित जाती व जमाती सेल, खेड तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही केवळ निवड नव्हे, तर जबाबदारीचा नवा संकल्प.!
शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मा. संतोष दत्ताराम खोपकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात निःस्वार्थ सेवा करत आले आहेत. गोरगरीब, वंचित आणि मागासवर्गीय समाजासाठी संघर्ष करण्याची त्यांची जिद्द व शिवसेनेच्या विचारधारेवरील निष्ठा यामुळे ते या जबाबदारीस योग्य ठरतात.
ही जबाबदारी म्हणजे केवळ पद नव्हे, तर शिवसेनेच्या विचारधारेचा झेंडा तालुक्यात अधिक जोमाने फडकवण्याचा संकल्प आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वाखाली, मा. संतोष खोपकर साहेब निश्चितच अन्यायाविरोधात लढतील, समाजाच्या न्यायहक्कांसाठी भक्कम उभे राहतील आणि खेड तालुक्यात शिवसेनेचा वटवृक्ष अधिक विस्तारतील.
मा. संतोष दत्ताराम खोपकर साहेब यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
“शिवसेना म्हणजे लढा, शिवसेना म्हणजे न्याय, शिवसेना म्हणजे मराठी अस्मिता!
जय शिवराय !! जय भीम !! जय महाराष्ट्र !!
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment