सारा न्यूज नेटवर्क -
गुढीपाडवा कडुलिंब वाढवा..! वृक्ष संवर्धन अभियान
इको नेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्कचा उपक्रम कडुलिंबाचे झाड लावून नूतन मराठी वर्ष साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- कडुलिंब हे भारतातील अमृत वृक्ष म्हणून सर्वांना परिचित आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील वन मानचिन्ह म्हणून कडुलिंबाची ओळख आहे. प्रत्येक सणा मागे वृक्षांचे महत्त्व आहे तसेच गुढीपाडवा या सणा दिवशी कडुलिंब याचे महत्त्व आहे.
कडुलिंब हे सर्वात आयुर्वेदिक गुणकारी असे औषधी वृक्ष आहे. व मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये ऑक्सिजन देण्याचे कार्य कडुलिंब हे वृक्ष करतात असे बहुगुणी हे वृक्ष जास्तीत जास्त लागवड करण्याच्या अनुषंगाने "गुढीपाडवा कडुलिंब वाढवा" हा उपक्रम इको नेचर क्लबच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वृक्ष संवर्धन अभियान करत हा उपक्रम करत आहेत त्यात विविध संघटना विविध संस्था सामाजिक वनीकरण वनविभाग सोलापूर सोशल फाउंडेशन माझी वसुंधरा अभियान असे पर्यावरण वर काम करणारे संस्था एकत्रित होऊन वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करत आहे आज औषधी वन अशोक नगर या परिसरामध्ये कडुलिंबाचं झाड लावून संदेश देण्यात आले.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, रोहित मोठे, पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर तसेच मनीषा जगताप ताई यांच्या उपस्थित कडुलिंब वृक्ष लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्याच्या अनुषंगाने सुरुवातही झालेली आहे व पूर्व नियोजित सर्व ओपन मोकळ्या परिसरात खड्डे खाण्याची सुरुवात झालेली आहे. या पर्यावरण संवर्धन चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे प्रतिक्रिया डॉ मनोज देवकर यांनी दिली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment