Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, March 25, 2025

महावितरण : सुनिल काळे (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांची मार्च २०२५ वीज बिल थकबाकी यादी निरंक..


 सारा न्यूज नेटवर्क - 

महावितरण : सुनिल काळे (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांची मार्च २०२५ वीज बिल थकबाकी यादी निरंक.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या मार्च २०२५ मधील थकबाकी वसुलीमध्ये शाखा कार्यालय औद्योगिक वसाहतचे वरिष्ठ तंत्रज्ञ सुनिल काळे यांनी घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांची शंभर रुपये वरील यादी निरंक केल्याबद्दल महावितरण सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे यांनी पुष्पगुच्छ व सुरक्षा साधने देऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

       यावेळी औद्योगिक वसाहत कार्यालयाचे शाखा अधिकारी अजय चव्हाण, धुळाप्पा टेळे, प्रदीप मुलादे, निलकंठ कांबळे, अनिलकुमार बनसोडे, नितीन कोळी, अपेक्षा बहादुरे, हिना बागवान आदी जनमित्र, यंत्रचालक उपस्थित होते.

       सदर थकबाकी यादी निरंक करण्यामध्ये महावितरण सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता आशिष मेहता, सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, औद्योगिक वसाहत कार्यालय शाखा अभियंता अजय चव्हाण, महावितरण सोलापूर शहर ई उपविभाग मधील बिलिंग विभाग कर्मचारी वर्ग, विशेष आभार सतिश बिराजदार व दिनेश जक्का, महावितरण वीज ग्राहक, मीटर रीडर, शुभचिंतक, हितचिंतक, सहकारी मित्र, सर्व कॅश काउंटर कर्मचारी वर्ग, प्रसार माध्यम व इतर ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केले आहे. अशा सर्वांचे सुनिल काळे यांनी याप्रसंगी मनापासून आभार मानले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment