Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 23, 2025

प्रबुद्ध रंगभूमीने दिलेला मानाचा महात्मा फुले फेटा हा माझ्यासाठी जगातील सर्वोच्च पुरस्कार - सीमाताई पाटील



सारा न्यूज नेटवर्क - 

प्रबुद्ध रंगभूमीने दिलेला मानाचा महात्मा फुले फेटा हा माझ्यासाठी जगातील सर्वोच्च पुरस्कार - सीमाताई पाटील

 देहुरोड(प्रतिनिधी) :- दि०२० राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता रमाई आंबेडकर यांच्या लेकीला, प्रबुद्ध रंगभूमीचा 'महात्मा फुले फेटा' प्रदान‌ होणे हा माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा पुरस्कार समजते. त्यामुळे महामाता सावित्री-रमाई-जिजाऊ माँसाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याची माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक धम्म‌भूमीवर होणाऱ्या या मानाच्या फेटा पुरस्काराने मी धन्य झाले असे भावूक उद्गार सुप्रसिद्ध शिव भीम शाहिरा सीमा पाटील यांनी काढले. अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साहित्य रत्न डॉ. कीर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते सीमाताईंचा म. फुले फेटा, सन्मानचिन्ह, पंचशील आभूषण,  गुलाब गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते व प्रबुद्ध रंगभूमीचे प्रवर्तक भीमपुत्र टेक्सास गायकवाड होते.


अ. भा. प्रबुद्ध नाट्य परिषद अंतर्गत प्रबुद्ध रंगभूमी पुणे च्या वतीने ऐतिहासीक  ध‌म्मभूमी देहूरोड येथे 20 मार्च २०२५ सायंकाळी, 'म.फुले फेटा प्रदान सोहळा संपन्न झाला प्रबुद्ध रंगभूमीच्या ४६ व्या वर्धापनदिनी समारंभात बोलताना भीमपुत्र टेक्सास गायकवाड म्हणाले की, ढोंगी व बेगडी

आंबेडकरवादी प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत भि.  शि. शिंदे , रामनाथ चव्हाण हे आपल्या भाटा मार्फत चुकीची माहिती पुरवून स्वतःच्या नावावर दलित रंगभूमी चळवळीतील योगदानाचा आपला नावावर खोटा इतिहास लिहून घेतात. दलित रंगभूमीने प्रबुद्ध रंगभूमीच्या ४६ वर्षाच्या योगदानाचा 

अवमान करुन मला नाटककाराच्या गर्दीतील एक  नाटकार दाखवून खोटा इतिहास लिहून घेतात. म्हणून मला तथाकथित भाट इतिहासकारांना सांगायचे आहे की, मर्दवीर आपल्या मर्दुमकीने इतिहास घडवितात मात्र नामर्द आपल्या लेखणीने खोटा इतिहास लिहतात. जे अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य तथागत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले मात्र त्यांच्या कार्याचे श्रेय भाट इ‌तिहासकार गांधीना देतात. असा तो प्रकार आहे. हे जाणकार इतिहासकार  कलावंत  आणि कार्यकत्यांनी लक्षात घ्यावे. 

या समारंभा मधे

प्रबुद्ध रंगभूमी ही एकमेव चळवळ  आहे जी ब्राम्हणवाद्याच्या मानवद्रोही कार्यास प्रतिबंध करण्याचे पर्याय देत आहे.  मनुवाद्या समोर आव्हान ठरत आहे. आणि डॉ आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारताच्या निर्मिती  रथास पुढे नेण्याचे बहुमोल कार्य करित आहेत. 

म.फुले फेटा प्रदान करताना डॉ. कीर्तीपाल गायकवाड हे सीमाताई विषयी बोलताना म्हणाले की, सीमाताईच्या सादरीकरणात माता रमाई-सावित्री अन् जीजाऊ साहेब दिसतात त्यामुळे या महा‌ मातांचा वारसा पुढे चालविण्यात म. फुलें चा फेटा त्यांना प्रेरणा देईल याची मला खात्री आहे.

       प्रसिद्ध अभिनेते गायक व प्रबोधनकार जॉली मोरे यांनी प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीचा गौरव करून म्हणाले की, तथागत बुद्धाची भूमिका करणाऱ्या सीमाताई पाटील या जगातील पहिल्या महिला आहेत तेव्हा समाजाला प्रबुद्ध करणार्या सावित्रीच्या लेकीचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग सादर व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून प्रबोधनाच्या या कार्यक्रमाला सहकार्य करावे. 

गायक व निवेदक दयानंद परिक्षाळे यांनी म.फुलेंचा हा फेटा म्हणजे म. फूलेंचे  मस्तक आहे. त्यांचे सत्यशोधक विचार या निमीत्ताने पुढे येतील. सुबच्चन राम (IRS), माजी कस्टम अधिकारी यांनी आपल्या भाषणात, या विश्वाला बाबा-साहेबांनी बौध्दीक चेतना देउन ज्ञानाची संस्कृती पुढे गेली बाबासाहेबांना पाण्यासाठी, महाडचा सत्याग्रह करावा  लागला .असे  सांगून या खोट्या व ढोंगी संस्कृतीवर  त्यांनी प्रहार केला. 

बौध्दाचार्य  त्रिभूवन गुरुजी यांनी प्रबुद्ध रंगभूमीच्या कार्यातूनच धम्म चळवळ गतीमान होईल असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात बुध्द रुपास सीमा‌ताई पाटील , जॉली मोरे व डॉ० कीर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते पुष्प वाहून करण्यात आली. जेष्ठ प्रबुद्ध विचारवंत कालकथित  मा म. देशमुख यांना आद‌रांजली वाहून सामुदायिक त्रिसरण पंचशील वंदना घेण्यात आणि पाहुण्यांची ओळख राहुलकुमार खांडेकर यांनी तर प्रबुद्ध रंगभूममीच्या कलाकारांची ओळख भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी करून दिली. प्रास्तविक प्रबुद्ध नाट्य परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सायरे यांनी केले  तर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार वसंत गायकवाड व अरुण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आहे सदिच्छापर मनोगत, धर्मपाल तंतरपाळे, ॲड . डॉ.  बाबा वानखडे, संगीता वाघमारे, मिलिंद  देशमुख,  प्रविण वाकोडे, राजाराम अस्वरे,   बापूसाहेब गायकवाड, अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले व मंगल कामना दिल्या भीमशाहीर हिरापुत्र भवार यांनी स्वागत गीत गायीले प्रमुख वक्ते राहुलकुमार खांडेकर यांनी आपल्या जोशपूर्ण भाषेणातुन दलीत रंगभूमीचा प्रबुद्ध रंगभूमी कडे प्रवास हा बंड, चीड, वेदना, अवहेलना इत्यादीतून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, स्वाभिमान असा आहे. भीमपुत्र  टेक्सास गायकवाड यांच्या दलित व प्रबुद्ध रंगभूमिच्या चळवळीची दखल इतिहासातून घ्यावी लागेल. असे ठणकावून सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड विहार कृती समितीचे सरचिटणीस अशोक गाय‌कवाड यांनी केले. यावेळी प्रबुद्ध प्रकाशन च्या ग्रंथाचा संच भीमपुत्र टेक्सास गायकवाड व डॉ कीर्तिपाल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले

या समारंभास राजाराम अस्वरे,  मीनाताई गायकवाड, रंजनाताई सोनव‌णे, अशोक सोनवणे अरुण जगताप, ॲड. डॉ. बाबा वानखेडे, ॲड नवीन वानखडे,अभिनेते भीमदास आरू, धर्मानंद चुव्हाण , शिवराज वाघ‌मारे,  जगन्नाथ गुंजाळ, यमराज इंगळे, आनंदकुमार सरवदे, डी०एम० मुकरे, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप नटश्रेष्ठ कुमार आहेर यांच्या जोशपूर्ण भाषणाने व आभार प्रदर्शनाने झाली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment