सारा न्यूज नेटवर्क -
महिला रणरागिणी पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा सारीकाताई चुंगे यांना "रणरागिणी पुरस्कार 2025 " प्रदान..
पुणे (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, ब्रीक्स ह्युमन राईट्स मिशन आणी आर के बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्दमाने जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट व यशस्वी कार्य करणार्या महीलांचा "रणरागीणी पुरस्कार सन्मान" सोहळा दिनांक 28 मार्च 2025 रोजी सुरभी मंगल कार्यालय, सहकार नगर, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मिलींद मोहीते पोलीस उपआयुक्त पुणे, श्री.आनंद पिंपळकर वास्तु तज्ञ,डाॅ.यलाप्पा जाधव ससुन हाॅस्पीटल,श्री. रविंद्र ठाकुर अभिनेता,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा हे उपस्थित होते तर श्री बाबुराव क्षेत्रे पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष, श्री.आनंद साळुंके अध्यक्ष आर के बहुउद्देशीय संस्था,वर्षा ताई साठे माजी नगरसेवीका, श्री. दिनेश पवार समाजसेवक आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकूण 41 महिलांना रनरागिनी सन्मान पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास असंख्य नागरिक उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ह्यूमन राइट्स, आर के बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment