Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 28, 2025

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे बाल कलावंतांबरोबर विशेष मुलांच्या कलेच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ साजरा.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे बाल कलावंतांबरोबर विशेष मुलांच्या कलेच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ साजरा. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा सोलापूर तर्फे जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील बालकलावंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यामध्ये नृत्य ,नाट्य, गायन, अभिनय यामधील गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या  विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांच्याही कलेचा सन्मान म्हणून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 



कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परिषदेच्या अध्यक्षा मा.सीमाताई यलगुलवार यांनी मुलांचे विशेष कौतुक करून बालरंगभूमी तर्फे संस्कार शिबिर व विविध कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पद्माकर कुलकर्णी प्रमुख अतिथी मा.विद्या काळे, मा. राजू रंगम ,मा. गायकवाड मॅडम , नॅब संस्थेचे सचिव मा. शशीभूषण यालगुलवार यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले.


 मा. पद्माकर कुलकर्णी व मा. विद्या काळे यांनी नृत्य नाट्य ,गायन, अभिनय विविध शिबिरे याविषयी सामान्य कलावंतांबरोबर दिव्यांग कलावंतांनी देखील विशेष शिक्षिका सौ.केसकर मॅडम यांच्या माध्यमातून हावभाव करून सांकेतिक भाषेतून मुक्त संवाद साधला. मुलांनीही आनंदाने त्यात सहभाग घेतला. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी उपाध्यक्ष सौ. अर्चना अडसूळ यांनी केले तर आभार सौ. अन्नपूर्णा साखरे यांनी मानले कार्यक्रमासाठी बालरंगभूमि परिषदेचे कार्यकारिणी सदस्य मा.सुभाष माने मा. मिलिंद ठोंबरे व सहभागी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक बालकलावंता पालकही कार्यक्रमासाठी उपस्थित होते

शेवटी सर्व मुलांना हुरडा चटणीच्या मेजवानी ने कार्यक्रमाची सांगता झाली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment