Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 24, 2025

विद्या लोंढे उर्फ विक्कीगुरू यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा त्यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून राज्यस्तरावरील "गौरी सावंत समाजसेवा पुरस्कार 2025" प्रदान..



सारा न्यूज नेटवर्क - 

विद्या लोंढे उर्फ विक्कीगुरू यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा त्यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून राज्यस्तरावरील "गौरी सावंत समाजसेवा पुरस्कार 2025" प्रदान.. 

उल्हासनगर (प्रतिनिधी) :- विद्या मारुती लोंढे उर्फ विक्कीगुरू यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेकडून कडून आज दि २३/३/२०२५ रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राज्यस्तरावरील गौरी सावंत समाजसेवा पुरस्कार 2025" प्रदान करण्यात आला 

 मा.विद्या मारुती लोंढे उर्फ विक्कीगुरु अनेक वर्ष सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे.धार्मिक समाजसेवा  क्षेत्रामध्ये आपण केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. आपण केलेल्या या उल्लेखनीय कामांचा गौरव होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मा.विद्या मारुती लोंढे उर्फ विक्कीगुरु यांना " (गौरी सावंत समाजसेवा पुरस्कार )2025 " म्हणून पुरस्कार देण्यात आला.


मा.विद्या मारुती लोंढे उर्फ विक्कीगुरु यांना आज उल्हासनगर येथे त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोरे, प्रदेशाध्यक्ष पितांबर शिंदे खजिनदार आकाश सोनवणे याच्या  हस्ते शाल सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment