Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 9, 2025

जिजामाता बहुउद्देशिय महिला मंडळ शेटफळ ता पंढरपूर संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सोलापूर कार्यालयात ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा...


 सारा न्यूज नेटवर्क 

जिजामाता बहुउद्देशिय महिला मंडळ शेटफळ ता पंढरपूर संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सोलापूर कार्यालयात ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा..


सोलापूर (प्रतिनिधी) :- जिजामाता बहुउद्देशिय महिला मंडळ त शेटफळ ता पंढरपूर संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सोलापूर येथील कार्यालयात ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित " कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. 


यावेळी संस्थेच्या सचिवा सौ पूजा शत्रुघ्न कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . संस्थेच्या सोशल वर्कर सौ . शिल्पा गायगवळी मॅडम सौ ज्योती हत्याळीकर मॅडम यांनी महिला दिनाचे महत्व पटवून सांगितले बालसंगोन योजनेच्या लाभार्थी बालकाच्या पालक प्रतिनिधी श्रीमती भट्टड मॅडम यांनी महिला दिनाच्या निमित्ताने खास कविता वाचन केले. 



या कार्यक्रमास बालसंगोपन योजनेच्या बहुसंख्य लाभार्थी महिलांनी आपली उपस्थिती दाखवली. भविष्यातही संस्था बालकांच्या व पालकांच्या करिता विविध उपक्रम राबविणार असलेचे तसेच प्रत्येक लाभार्थी बालकांना संगोपन योजनेचे १२ महिन्याचे अनुदान बालकाच्या खात्यात जमा होण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशिल असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले . कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या सौ अनिता राऊत मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांचे व पालकांचे आभार मानले सदर कार्यक्रम संस्थेचे मानद प्रकल्प संचालक श्रीयुत शत्रुघ्न कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment