Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 29, 2025

सोलापुरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विडी घरकुल येथे इफ्तार पार्टीचा कार्यक्रम संपन्न...


 सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापुरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विडी घरकुल येथे इफ्तार पार्टीचा कार्यक्रम संपन्न...

सोलापूर (प्रतिनिधी) :- रमजान महिन्यात, उपवास सोडण्यासाठी संध्याकाळी जेवण म्हणजे 'इफ्तार'  असतो, जो सूर्यास्ताच्या वेळी केला जातो. 

रमजान महिन्यात, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास (रोजा) ठेवला जातो. इफ्तार हा रमजान महिन्याच्या उपवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.


 याच पद्धतीने सोलापुरात नवीन विडी घरकुल " क " विभागात सोलापूर नामा 24 न्यूज चैनल, व साप्ताहिक यश संघर्ष चे संपादक सादिक शेख  यांच्यावतीने इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमात इफ्तार पार्टी साठी खजूर, कलिंगड, खरबूज व वेगवेगळे ड्रायफ्रूट,थंड कोल्ड्रिंक्स, देऊन रोजा इफ्तार करण्यात आला.

 कार्यक्रमात विविध मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.



 त्यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, नवीन विडी घरकुल "क " विभागचे इन्चार्ज बापू साबळे, वसीम देशमुख, एजाज खलिफा, रफिक काझी, हसन शेख, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे,वरिष्ठ पत्रकार इब्राहिम जमादार, वरिष्ठ पत्रकार जावेद देशमुख, अफजल पठाण, अखिल सय्यद, श्रीकांत कोळी, नागनाथ गणपा, नरेश सब्बन,इरफान शेख, मेहबूब कादरी, अजहर बिजापुरे, रफिक मुल्ला, अकबर शेख,परवेज मुल्ला, अब्दुल सत्तार शेख, शरीफ इनामदार, हुसेन शेख, मुर्तूज शेख,व अनेक मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचा शेवटी सोलापूर नामा 24 न्यूज चैनलचे संपादक सादिक शेख यांनी  आभार व्यक्त केला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment