Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 23, 2025

ह.भ.प धर्मराज महाराज वाडकर (कासेगावकर )यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ह.भ.प धर्मराज महाराज वाडकर (कासेगावकर )यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन; 

मोफत ७५ ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटपाचा उपक्रम.. 

कासेगाव(प्रतिनिधी) :- तालुका दक्षिण सोलापूर कासेगाव येथील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प धर्मराज महाराज वाडकर (कासेगावकर)यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त

भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले, सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा मराठीतील १८ अध्याय असलेला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका या ग्रंथाच्या वाटपाच्या उपक्रमास सुरुवात झाली.


कीर्तनकार म्हणलं की,आपल्याला हे शब्द आठवतात कीर्तनाची परंपरा, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, जुन्या विचारांची व सद्य परिस्थितीची सांगड घालत कीर्तनकार मनोरंजन आणि समाज प्रबोधन करतात. वाचन संस्कृती वाढावी, संतांचे विचार सर्वसामान्यांमध्ये रुजावे या हेतूने हा आगळा-वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

७५  व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैकुंठवासी ह.भ प मामासाहेब दांडेकर प्रासादिक सार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.कान्होबा महाराज तसेच संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज ह.भ.प जयवंत महाराज बोधले यांना देऊन या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

सोलापूर, धाराशिव जिल्हा व परिसरात या ग्रंथाच्या प्रती वितरीत केल्या जात आहेत.

आज शनिवार दिनांक २२मार्च २०२५ रोजी ज्ञानेश्वरी ग्रंथाची ६४ वी प्रत कासेगावचे ज्येष्ठ कीर्तनकार कैलासवासी ह.भ.प तुकाराम महाराज पवार , साक्षात्कारी वारकरी सावरगावचे कैलासवासी अंबादास फंड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू सचिन भरत पवार यांना ह. भ. प धर्मराज महाराज वाडकर कासेगावकर यांच्याकडून सेवार्थ ग्रंथरूपी अध्यात्मिक भेट  देण्यात आली.

यावेळी गावातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment