Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, March 18, 2025

प्रत्येक घरा समोर एक वृक्ष एक जलपात्र सुरुवात.. बल्लाळ दांपत्याने दोन्ही मुलींच्या हस्ते वृक्ष लावून केली सुरूवात..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" 

 प्रत्येक घरा समोर एक वृक्ष एक जलपात्र सुरुवात..

बल्लाळ दांपत्याने दोन्ही मुलींच्या हस्ते वृक्ष लावून केली सुरूवात..

सोलापूर (प्रतिनिधी) :- "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या काव्या प्रमाणे प्रत्येक घरासमोर एक वृक्ष व एक जलपात्र ठेवण्याचा संकल्प सुरू केला आहे. 

यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून तसेच इतर पर्यावरण प्रेमी सोसायटीतील रहिवासी पर्यावरण संस्था एकत्रित कार्य करत आहेत. मा. मंत्री व विद्यमान आमदार सुभाष जी देशमुख यांच्या हरित संकल्पनेला प्रतिसाद देत प्रत्येक सोसायटीमध्ये घरासमोर वृक्ष लागवड करण्यास सुरुवात झालेली आहे.  

पर्यावरणदुत डॉ मनोज देवकर यांनी पर्यावरण प्रबोधन करत विजयकुमार देशमुख नगर मधील प्रत्येकांना पर्यावरणाची शपथ व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच वृक्षप्रेमी राम हुंडारे यांनी वृक्षारोपण करण्यासाठी प्रबोधन करत सोसायटीतील सदस्यांना "एक मूल एक झाड आणि एक जलपात्र" याचे महत्व सांगितले. जलपात्र व वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त केले.. 

त्या निमित्ताने सोसायटीतील सदस्य विद्या व सचिन बल्लाळ दांपत्याने त्यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करून समाजातील प्रत्येकाला एक संदेश दिला. "एक मुल एक झाड व एक जलपात्र " 

पर्यावरण प्रेमी सचिन बल्लाळ यांनी विजापूर रोड परिसरातील  सोसायटीमध्ये वृक्ष लागवड करण्यास पुढाकार घेतलेला आहे. पेरू आंबा लिंबू कडुलिंब औषधी व देशी वृक्ष असे वेगवेगळे झाडांचा संकलन करून प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करीत आहेत व प्रत्येक झाडाखाली तहानलेल्या चिऊतासाठी पाण्याच्या सोयीसाठी जलपात्रही ठेवत आहेत.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment