Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 3, 2025

प्रा.विलास धस यांना" शिक्षणरत्न पुरस्कार 2025 " राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

प्रा.विलास धस यांना" शिक्षणरत्न पुरस्कार 2025 " राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.

 शिक्षणक्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची घेतली दखल;

मा.कॅबिनेट मंत्री सुर्यकांत गवळी यांच्या हस्ते सत्कार व सन्मान.. 

उल्हासनगर (प्रतिनिधी) :- संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सव 2025" ठाणे उल्हासनगर संत रविदास महाराज चौक खेमाणी या ठिकाणी मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. 

त्या निमित्ताने " संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार " 2025 समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना प्रदान करण्यात आला. 


 प्रा.विलास धस यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कडून संत रविदास महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील "शिक्षणरत्न पुरस्कार 2025" प्रदान करण्यात आला. 


प्रा.विलास धस यांना स्वतः शिक्षण घेत असताना ज्या अडचणी येत होत्या. त्या अडचणी माझ्या गरीब व गरजू समाज बांधवांना येऊ नये म्हणून,आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना मदत करण्याचे काम केले व आजही निरंतर करीत आहेत. त्याचबरोबर मराठी भाषा संमेलन, विविध विषयांचे मेळावे,चर्चा सत्र,यांचे अजून करून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी पर्यंत केले व आजही करीत आहे. 

    हेरंब फाउंडेशन ची स्थापना :

त्यासाठी प्रा. विलास धस यांनी "हेरंब फाउंडेशन महाराष्ट्र राज्य" ची स्थापना केली. या फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करित आहेत. 

 त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने  प्रा.विलास धस यांना " शिक्षणरत्न पुरस्कार 2025 " म्हणून पुरस्कार देण्यात आला. 


 त्यांचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल मा.सुर्यकांत गवळी मंत्री महाराष्ट्र राज्य कॅबिनेट दर्जा, संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोंरे, प्रदेशाध्यक्ष पितांबर शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment