Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, March 13, 2025

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स तर्फे राम हुंडारे यांचा केक कापुन पुष्पगुछ देऊन वाढदिवस साजरा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स तर्फे राम हुंडारे यांचा केक कापुन पुष्पगुछ देऊन वाढदिवस साजरा..

सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे  संपादक राम हुंडारे यांचा वाढदिवसानिमित्त पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स व्हीआयपी रोड सोलापूर यांच्या वतीने केक कापून व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



राम हुंडारे हे पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली अनेक वर्षांपासून पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना घरकुल योजना राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिरात याच बरोबर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्न व अडचणी बाबत राम हुंडारे यांनी पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात मांडून आक्रमक भूमिका बजावली असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त पु. ना गाडगीळ ज्वेलर्स व्हीआयपी रोड सोलापूर येथील शोरूमचे मॅनेजर राहुल बाकळे यांच्याहस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पु.ना गाडगीळ ज्वेलर्स मधील सर्व स्टाफ उपस्थित होता. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे






No comments:

Post a Comment