Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, March 6, 2025

जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रम संपन्न...


 सारा न्यूज नेटवर्क - 

जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रम संपन्न...

कष्टकरी महिलांचे स्थान सर्वश्रेष्ठ :  वीणा पवार

सोलापूर (प्रतिनिधी) : - जागतिक महिला दिनानिमित्त* बुधवार दि. 5 मार्च 2025 रोजी एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते...


बुधवारी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  यामध्ये शाळेतील माता-पालक तसेच परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला...

 50 हून अधिक महिलांनी यामध्ये भाग घेतला होता. *रवा व बटाटा यापासून तिखट पदार्थ बनविणे* तसेच *खव्यापासून गोड पदार्थ बनवणे* अशा दोन प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या...



 या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व जिल्हा प्रशासन अधिकारी *मा.वीणा पवार मॅडम* व सोलापुरातील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट *मा.डॉ.नेहा सिंह रोडा* यांच्या शुभहस्ते करण्यात आले...

 



प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले....



 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्पर्धेच्या संयोजिका प्रशालेचे मुख्याध्यापिका *मा.सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार* ह्या होत्या...

 प्रमुख पाहुण्या *मा.वीणा पवार मॅडम* यांनी या परिसरात कष्टकरी सर्व महिलांचे विशेष कौतुक केले...

 तसेच कष्टकरी महिलांचे स्थान समाजामध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले. कामातून वेळ काढून अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छाही दिल्या...

 आणि प्रमुख पाहुण्या *मा.डाॅ. नेहा सिंह रोडा* यांनी महिलांनी दैनंदिन जीवनामध्ये आपले आहाराकडे लक्ष द्यावे तसेच दररोज काही सोपे परंतु लाभदायक व्यायाम देखील करावयास त्यांनी सांगितले...

 अध्यक्षीय भाषणामध्ये *मा.सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार* यांनी महिलांना कौटुंबिक कामकाजा बरोबर इतर सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले...

 तसेच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देण्याविषयी सांगितले...

 


या स्पर्धेत *रवा व बटाटा पासून बनवलेल्या तिखट पदार्थ* या स्पर्धेतील विजेते -

 *प्रथम क्रमांक - स्मिता शहाणे,* 

 *द्वितीय क्रमांक - सुमन माणेकरी,* 

 *तृतीय क्रमांक - विजयालक्ष्मी हंडलगी,* 

 *उत्तेजनार्थ - विजयालक्ष्मी नागठण* 

 तसेच *खव्यापासून गोड पदार्थ बनवणे* या स्पर्धेतील विजेते -

 *प्रथम क्रमांक -  शबाना शेख,* 

 *द्वितीय क्रमांक - दिपाली बंगरगी,* 

 *तृतीय क्रमांक - लक्ष्मी कल्याणम,* 

 *उत्तेजनार्थ - राधा राजखडे* या सर्व विजेत्या स्पर्धकांना रुपये 4000/- रु.3000/- रु. दीड हजार व रु.500 अशा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसे प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले...


 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक *मा.सुभाष माने* यांनी केले...

या स्पर्धेचे *परीक्षक* म्हणून प्राध्यापिका मा *.सौ.अर्चना अडसूळ* यांनी काम पाहिले

तसेच सूत्रसंचालन *मा.सौ.वैशाली शहापुरे* यांनी केले तर आभार *मा.मानसी निलंगीकर* यांनी मानले...

यावेळी स्वामी विवेकानंद शिशु व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता व्हनमाने आणि परिसरातील महिलावर्ग व शिक्षकवृंद उपस्थित होते...

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment