Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, March 6, 2025

क्राईम न्यूज : पुण्यात नाना पेठेतील कादर भाई गल्लीत आलेल्या दोघांकडून ११ लाख ४० हजारांचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ हस्तगत

 


सारा न्यूज नेटवर्क - 

क्राईम न्यूज : पुण्यात नाना पेठेतील कादर भाई गल्लीत आलेल्या दोघांकडून ११ लाख ४० हजारांचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ हस्तगत

पुणे ( देवप्पा शिंदे ) :- अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी थांबलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ११ लाख ४० हजार रुपयांचे ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. अदीब बशीर शेख (वय २९, रा. पेन्शनवाला मस्जिद, नाना पेठ) आणि यासीर हशीर सय्यद (वय ३०, रा़ मिठानगर, कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक नाना पेठेत पेट्रोलिंग करत होते. समर्थ पोलीस ठाण्यातील अंमलदारांसमवेत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना नाना पेठेतील कादर भाई गल्लीत दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी उभे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहिल्यावर दोघे जण दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अदीब शेख याच्याकडे मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. ही मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर कोणाकडून मिळाली अशी चौकशी केल्यावर त्याने यासीर शेख याच्याकडून विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडे प्रत्येकी १ लाख रुपयांचे अ‍ॅपलचे मोबाईल, वजनकाटा व इतर साहित्य असा एकूण १३ लाख ४२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.


 ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयुर सूर्यवंशी, साहिल शेख, संदिप जाधव, उदय राक्षे, योगेश मांढरे, युवराज कांबळे, तसेच समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार इम्रान शेख, कल्याण बारोटे यांनी केले आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment