Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 3, 2025

संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय "समाजसेवा पुरस्कार 2025" संतोष गायकवाड यांना माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधान...

  


सारा न्यूज नेटवर्क - 

संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय "समाजसेवा पुरस्कार 2025" संतोष गायकवाड यांना माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान... 

ठाणे (प्रतिनिधी) :- संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उल्हासनगर खेमाणी चौक ठाणे येथे संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांना संत रविदास राज्यस्तरीय "समाजसेवा पुरस्कार 2025" चा माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आला,





आपल्या सामाजिक सेवा क्षेत्रातील संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मुद्रा योजनेमधून त्यांना स्वतःच्या पायावर व्यवसाय व त्यांचे हात मजबूत करण्यासाठी विविध सहकारी बँके मधून त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांना समाजामध्ये ताठ मानेने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास Gk मागासवर्गीय संस्थेने अखंडितपणे 40 उद्योजकांना कर्ज मंजूर करून त्यांच्या पायावर उभा केले आहे.


 या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोरे, प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे, अशोक सवईकर, दिनेश माने, आकाश सोनवणे, मयूर लहाने आदींच्या सहभागाने यशस्वीपणे पार पडले. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे


No comments:

Post a Comment