Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 5, 2025

महावितरण कार्यालय मध्ये ४ मार्च लाईनमन दिन साजरा. लाईनमन दिनानिमित्ताने प्रकाशदूत यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान.

सारा न्यूज नेटवर्क - 

महावितरण कार्यालय मध्ये ४ मार्च लाईनमन दिन साजरा.

 लाईनमन दिनानिमित्ताने प्रकाशदूत यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान.

 सोलापूर (प्रतिनिधी) :- केंद्र शासनाने ४ मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून घोषित केलेला आहे. त्याच अनुषंगाने महावितरण सोलापूर शहर ई उपविभाग येथे ४ मार्च लाईनमन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

       सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता मा.श्री. आशिष मेहता साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा.श्री. प्रदीप मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. ई उपविभागातील अधिकारी, कर्मचारी, जनमित्र, बाह्यस्तोत्र तंत्रज्ञ, शिकाऊ उमेदवार या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

       अध्यक्षीय भाषणामध्ये मा.श्री. आशिष मेहता साहेब यांनी ४ मार्च लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देऊन महावितरण मधील चालू घडामोडी, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, ग्राहकाभिमुख तत्पर सेवा, प्रसंगाचे गांभीर्य, भविष्यात कामकाजामध्ये होणारे बदल अशा विविध विषयाबाबत मार्गदर्शन केले. मा.श्री. प्रदीप मोरे साहेब यांनी देखील जनमित्रांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जनमित्र सुनिल काळे, रविंद्र कोळी, रमेश कुंभार, संजय फताटे, प्रविण माने, अनिलकुमार बनसोडे, धनराज पारेकर, स्वप्निल कोरे, धुळाप्पा टेळे, सचिन कानडे, संतोष कुंभार, जैनोद्दीन शेख, रोहिदास डांगे, मल्लिनाथ मुन्नोळी, चंद्रकांत कोळी, किरणकुमार इरनाळे, प्रदीप मुलादे, अजिंक्य खिलारे, नितीन कोळी, नंदकुमार मार्तंड, श्रीशैल विजापूरे, बसवराज कुरे, उमेश शेवाळकर, अपेक्षा बहादुरे, चंद्रकला शिंदे, प्रमिला सुरवसे, अर्चना घोडके यांच्यासह ई उपविभागतील इतर जनमित्र, बाह्यस्तोत्र तंत्रज्ञ, शिकाऊ उमेदवार या सर्व प्रकाशदूतांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आले.

       महावितरण मधील अधिकारी यांच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमास सर्व जनमित्र उपस्थित राहणार असल्याकारणाने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन संदर्भाने भारतीय डाक, सोलापूर जिल्ह्याचे व्यवस्थापक विनायक पासंगराव, डेव्हलपमेंट ऑफिसर जे. बी. ठाकूर, अजय मीना, परशुराम धुळे, वैभव जाधव आदींनी सदर कार्यक्रमाप्रसंगी भारतीय डाक विभागाचे विविध योजना समजावून सांगून, उपस्थितांचे जे काही शंका-कुशंका आहेत त्याचे निरासरण केले. जेणेकरून येणाऱ्या काळात सर्वांना या योजनांचा लाभ घेता येईल.

       अल्पोपहार व चहापानानंतर अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

केंद्र शासनाने ४ मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून घोषित केलेला आहे. त्याच अनुषंगाने महावितरण सोलापूर शहर ई उपविभाग येथे ४ मार्च लाईनमन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment