सारा न्यूज नेटवर्क -
बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन...
सोलापूर (प्रतिनिधी) :- बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉज फेडरेशन च्या माध्यमातून महाराष्ट्राची अस्मिता जपणारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक बँक ऑफ महाराष्ट्र आज इतक्या मोठ्या आंदोलनास सामोरे जात आहे आंदोलन यशस्वी करताना जनतेचा पूर्णतः पाठिंबा आहे हे मान्य करावे लागेल.
आंदोलनाची पार्श्वभूमी सांगत असताना गेले कित्येक वर्षातून बँकेतून नोकर भरती शिपाई भरती लिपिकांची भरती होत नाहीये हंगामी सफाई कर्मचाऱ्यांची पूर्ण भरती होत नाहीये या कारणांनी हे धरणे आंदोलन पुकारले आहे 17 तारखेला बँक ऑफ महाराष्ट्र च्या मुख्य कार्यालयावर एक दिवसाचा धरणे आहे तर त्यानंतर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर येत्या 20 मार्चला बँक ऑफ महाराष्ट्र देशव्यापी संपावर जाणार आहे हा देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी समाजातून विविध विविध संघटनांनी आम्हाला पूर्णतः पाठिंबा दिले आहे आणि या आंदोलनाचे जन आंदोलन मध्ये रूपांतरित होईल कारण बँकेला जनता देखील पूर्णतः पाठिंबा देत आहे या बँकेच्या रास्त मागणी आहेत जे आज बँकेचे कर्मचारी वर्ग समोर आलाय तर आम्ही त्यांच्या बरोबरीने आहोत असा विश्वास जनतेतून प्रकट होत आहे.
याप्रसंगी या धरणे आंदोलनास मार्गदर्शन व पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते कॉ नरसय्या अडम
सोलापूर कृती समितीतिचे कॉ शंतनू गायकवाड, कॉ अशोक इंदापूरे, कॉ दिनेश बनसोडे, कॉ कोल्हे बँकिंग क्षेत्रातून कॉ अल्मेडा, कॉ कुसगल
याचबरोबर या धरण्या स सोलापूर शहर व ग्रामीण भागातून शिपाई बंधू त्याचबरोबर हे मोठ्या संख्येने उपस्थित होते
या आंदोलनाचे सांगता सायंकाळी पाच वाजता बँक ऑफ महाराष्ट्र च्या क्षेत्रीय कार्यालयास भेट देऊन कार्यालयाच्या मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनास उपस्थित सर्व बँक कर्मचारी हे बहुसंख्येने उपस्थित होते आणि आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment