Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 9, 2025

दैनिक लोकशाही मतदारच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा केला सन्मान.. परिचारिका वर्षा बनसोडे यांचा शाल सन्मानपत्र व पुस्तक देऊन केला सत्कार..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

दैनिक लोकशाही मतदारच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा केला सन्मान..

परिचारिका वर्षा बनसोडे यांचा शाल सन्मानपत्र व पुस्तक देऊन केला सत्कार.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- देशभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी महिलादिन साजरा केला जातो संघर्षवादी महिलांचा सन्मान केला जातो महिला या कुटुंबाची मोठी व महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष निर्भिडपणे काम करत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात सामाजिक राजकीय शैक्षणिक तथा विविध क्षेत्रात काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी जेणेकरून त्यांना काम करण्यासाठी नव्याने आणखी ऊर्जा मिळेल यासाठी दैनिक लोकशाही मतदार वतीने "नारी शक्तीचा" सन्मान समाज कल्याण हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरवात माता सावित्रीमाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुष्टरोग तज्ञ तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते यु. एफ. जानराव हे होते तर 


प्रमुख उपस्थिती म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, शहर अध्यक्ष अन्सार तांबोळी (बी.एस), दैनिक लोकशाही मतदार चे प्रमुख सल्लागार ॲड.दिलीप जगताप सल्लागार ॲड.सागर हंबीरराव हे होते.


यांचा करण्यात आला सन्मान -

वर्षा बनसोडे - अधीपरिचारीका

विशाखा उबाळे - भीम आर्मी अध्यक्ष

मनीषा कांबळे - गुप्तचर विभाग सोलापूर (SID)

रक्षंदा स्वामी - पत्रकार

साधना गायकवाड - सामाजिक कार्यकर्त्या तथा आंबेडकरी चळवळीतील नेत्या

नुसरत शेख - सामाजिक कार्यकर्त्या 

लैला अष्टुळ - सामाजिक कार्यकर्त्या

नाझिया काझी - पोलिस कर्मचारी (महिला तक्रार निवारण)


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment