सारा न्यूज नेटवर्क -
शेतातील वहिवाटीचा रस्ता उकरुन टाकुन,जिवे मारण्याची धमकी दिले प्रकरणी बोराळ च्या शेतकऱ्याचा पोलीस अधीक्षकांना तक्रारी अर्ज सादर...
मंगळवेढा (प्रतिनिधी) :- मु.पो. बोराळ तालुका मंगळवेढा येथील शेतकरी सातलिंग भिमराव घोडके यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,
मी सातलिंग घोडके राहणार बोराळ ता. मंगळवेढा या ठिकाणी माझी पत्नी व माझा मुलगा यांचे सोबत राहण्यास आहे. सदरहू माझी जमीन गट नं. ६२१ गेली २० वर्षापासुन मी वहिवाटुन मी माझा व माझ्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह, करत आहे. माझ्या जमीनीच्या लगत संतोषी कुंभार यांची जमीन असुन सदरहू जमीन माधव तमन्ना कुंभार हे वहिवाटीत आहेत. तरी १० दिवसापासुन महादेव तमन्ना कुंभार हे मला माझी जमीन वहिवाटत असताना अरेरावीची भाषा वापरुन शिवीगाळ करतात व माझ्या शेताचा बांध टोकरतात, त्यांना कित्येकवेळा त्यांना समजावुन सांगुन त्यांच्या वागण्यात बदल होत नाही. सदर महादेव कुंभार हा या ना त्या कारणाने मला तुला लय मस्ती अली, तुझ्या कुटुंबाला संपवल्याशिवाय राहणार नाही, व तुमच्या वंशाला दिवा ठेवणार नाही म्हणुन वारंवार दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देत आहे. गेले २ ते ३ दिवसापुर्वी महादेव कुंभार व तिचे इतर ३ ते ४ साथीदार यांनी मिळुन मी जी जमीन वहिवाटीत आहे त्या जमीनीत माझ्या वहिवाटीच्या रस्त्याला जे.सी.बी लावुन रस्ता निस्तोनाबुत करुन सदरहू रस्ता उकरुन टाकला. याचा जाब विचारायला गेलो असता, महादेव कुंभार यांनी व त्याच्या तीन साथीदार यांनी मला माझ्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देवुन शिवीगाळ केली.
तरी महादेव तमन्ना कुंभार व त्याचे तीन साथीदार मिळुन नेहमीच मला त्रास करीत आहेत व माझ्या शेतातील वहिवाटीचा रस्ता हा जे.सी.बीच्या सहाय्याने उकरुन टाकलेला आहे..
तरी या इसमापासुन मला व माझ्या कुटुंबीयांना जिवीतास धोका आहे. तरी सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदर इसमांविरुध्द कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व माझा रस्ता पुर्वरत करुन मिळावा ही विनंती असा तक्रारी अर्ज आज ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment