सारा न्यूज नेटवर्क -
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डायमंड स्पिरिट फाउंडेशन तर्फे तीन दिवसीय महिला महोत्सव..
पनवेल (प्रतिनिधी) :- महिला दिनानिमित्त डायमंड स्पिरीट फाउंडेशन नवीन पनवेल या संस्थेने 18 ,19 ,20 मार्च असा तीन दिवसीय महिला महोत्सव आयोजित केला होता. त्यामध्ये शंभराच्या वर स्त्रियांनी भाग घेतला .
डायमंड स्पिरिट फाउंडेशन ही संस्था नवीन पनवेल स्थित असून सामाजिक भान जपत ही संस्था विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. प्रत्येक वर्षी महिला दिनानिमित्त ही संस्था सर्व स्तरातील स्त्रियांसाठी आगळावेगळा महोत्सव आयोजित करते.
महोत्सवामध्ये दोन दिवस माधवबाग येथे आरोग्य सहल आयोजित केली होती त्यामध्ये पंचकर्म, इसीजी, विविध चाचण्या करण्यात आल्या पनवेल मधून खोपोलीला जाण्यासाठी महिलांसाठी खास बस आयोजित केल्या होत्या. तसेच नाश्ता, दुपारचे जेवण ही फी देण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी
20 मार्च रोजी स्त्रियांसाठी चार वाजता व्यवसाय वृद्धी व मार्गदर्शन यासाठी पुण्याच्या प्रसिद्ध व्याख्यात्या वैशाली पाटील संस्थापिका /अध्यक्ष कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट पुणे महाराष्ट्र सेवाभावी सामाजिक संस्थांच्या वैशाली पाटील यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं . वैशाली पाटील यांनी स्त्रियांना खुर्चीवर खेळवून ठेवत ठेवत उस्फुर्तपणे मार्गदर्शन केले.
त्यावेळी वीणा वर्ल्ड च्या स्मिता जोशी कडून स्त्रियांना शॉपिंग बॅगचे वाटप करण्यात करण्यात आले.
स्त्रियांसाठी असा आगळावेगळा महोत्सव आयोजित केल्याबद्दल सर्व स्तरातून डायमंड स्पीड फाउंडेशनचे कौतुक होत आहे . उपस्थित महिलांनी डायमंड स्पिरिट फाउंडेशनचे आभार मानून असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करावा असे नमूद केले. ज्यांनी संस्थेमध्ये दोन वर्षापेक्षा जास्त काळ सहभाग घेऊन समाजकार्यास मदत केली अशा सभासदांचा सत्कार करण्यात आला यामध्ये संस्थेचे अध्यक्ष नम्रता धनवडे, सहसचिव संध्या बेले, सभासद बैला डाबी, जयश्री पटेल , सुशीला शांघाई अर्चना रिंके यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजक उज्वला राले, सचिव रूपाली जोशी सहसचिव संध्या बेले यांनी मेहनत घेतली. या तीन दिवसांमध्ये महोत्सवात जवळपास 120 बायकांनी सहभाग नोंदवला यावेळी डायमंड स्पिरिट फाउंडेशनच्या अध्यक्ष नम्रता धनवडे, कुसुम वासल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील, वीणा वर्ल्ड च्या स्मिता जोशी , डायमंड स्पिरिट फाउंडेशनचे सभासद संध्या बेले शुभदा भुकण, दीप्ती खिस्ते क्रांती जाधव, भारती पानपट किरण कुशवाह, ज्योती साळवे आणि अश्विनी बोरुडे उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment