Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 7, 2025

राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बस मधून मोफत प्रवास मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.. परिवहन मंत्र्याची लवकरच भेट घेणार - जिल्हाध्यक्ष राम हुंडारे



 सारा न्यूज नेटवर्क - 

राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बस मधून मोफत प्रवास मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.. 

परिवहन मंत्र्याची लवकरच भेट घेणार - जिल्हाध्यक्ष राम हुंडारे 

सोलापूर (प्रतिनिधी ):-  गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. 


पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून  ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटार सायकलवरून प्रवास करावा लागतो  जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यायला जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री यांचे दौरे बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते  ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वर जाने -येणे परवडत नाही त्याच बरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोल चा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्ताकंन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकरीचे झाले आहे.  जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्वाची असल्याने पत्रकारांना यावे लागते अनेकदा ऊन वारा व पाऊसामुळे पत्रकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो त्याच बरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे  ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळवा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. 




 ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळणे कामी परिवहन मंत्र्याची लवकरच भेट घेणार -- जिल्हाध्यक्ष राम हुंडारे 

ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न हे  गंभीर असतात अल्प मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन वार्ताकंन करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी एसटी बसमधून मोफत प्रवास मिळण्यासाठी लवकरच पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्टमंडळ मुंबई येथे राज्याचे परीवहन मंत्री यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी कानावर घालणार असल्याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांनी यावेळी सांगितले 

या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख शहर अध्यक्ष (महिला विभाग ) रक्षंदा  स्वामी  कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद वैभव राऊत योगेश स्वामी इम्रान आत्तार दत्ता कोळी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment