सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय "समाजसेवा पुरस्कार 2025" रमेश शिंदे यांना माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधान...
ठाणे (प्रतिनिधी) :- संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उल्हासनगर खेमाणी चौक ठाणे येथे संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये पुणे मावळ येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश मारुती शिंदे यांना संत रविदास राज्यस्तरीय "समाजसेवा पुरस्कार 2025" चा माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आला,
रमेश मारूती शिंदे हे संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत या संस्थेचे शहर अध्यक्ष आहेत.
त्यांनी गेले २५ वर्षे समाज सेवे मधे सक्रिय चर्मकार समाजासाठी शासनाच्या विविध योजना समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले, चर्मकार समाजासाठी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सक्रिय समाजासाठी कार्यक्रमात सहभाग घेतला संत शिरोमणी गुरू रविदास जयंती निमित्त अनेक वेगवेगळे कार्यक्रमात सहभाग घेत आले आहेत. विवीध आंदोलनात सहभाग, तहसील कार्यालयात निवेदन देण्यात सहभाग घेत आलेले आहेत असे अनेक कार्यक्रम आंदोलन चर्मकार समाजासाठी त्यांनी केलेल आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोरे, प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे, अशोक सवईकर, दिनेश माने, आकाश सोनवणे, मयूर लहाने आदींच्या सहभागाने यशस्वीपणे पार पडले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment